जळगाव वार्ता :- शेतीतून उत्पन्न निघत नसल्याने तरुण कर्जबाजारी झाला व त्यानंतर त्याने यु ट्यूबवरून अफुची शेती करण्याबाबत माहिती जाणून घेतली मात्र जिल्हा पोलिस अधीक्षक डॉ.प्रवीण मुंढे यांच्यासह पथकाने कारवाई करीत तरुणाला बेड्या ठोकल्याने खळबळ उडाली आहे. जळगाव जिल्ह्यातील, चोपडा तालुक्यातील वाळकी येथे ही कारवाई करण्यात आली.

नापिकीमुळे तरुण झाला कर्जबाजारी
जळगाव जिल्ह्यातील चोपडा येथून ३५ किमी अंतरावर बुधगाव रोडवर तालुक्यातील वाळकी येथे संशयित आरोपी प्रकाश सुदाम पाटील या तरुणाकडे 8 बिघे शेती आहे. परंतु सततच्या नापिकीमुळे तो कर्जबाजारी झाला होता. त्यानंतर त्याने वेगळ्या मार्गाने पैसा कमविण्याचे ठरविले. प्रकाशने युट्युबवरून अफूची शेती कशी करता येईल?, याचे धडे घेतले. यानंतर त्याने जवळपास चार बिघे (तीन एकर) या क्षेत्रात अफूची शेती केली. कुणाला संशय येऊ नये म्हणून आजूबाजूला मका पेरला. दरम्यान स्थानिक पातळीवरून गुप्त माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी कारवाई करण्याचे ठरविले.
