प्रतिनिधी फुलचंद भगत
वाशिम:-मंगरुळपीर शहरालगतच्या स्मशानभुमीलगतच्या एका खाजगी गोडावुनवर मंगरुळपीर महसुल विभाग आणी पोलीसांनी छापा टाकुन राशन तस्करीप्रकरणी खाजगी गोडावून सिल केले आहे.सदर गोडावूनमध्ये राशनचे धान्य आहे का?कीती पोते धान्य आहे?सदर माल कुठुन आणन्यात आला?तसेच यामध्ये दोषी कोणकोण आहे? याविषयी महसुल आणी पोलिस प्रशासन चौकशी करुन पुढील कारवाई करणार असल्याचे समजले.
