इंदापूर तालुक्यात शेतकऱ्यांची भुईमुगात अफूची लागवड , गुन्हा दाखल

पुणे वार्ता :- भुईमुग आणि लसूण या पिकांमध्ये आंतरपीक म्हणून अफू या अंमली पदार्थांच्या काही झाडांची लगवड केल्याचा धक्कादायक प्रकार पुणे जिल्ह्यातील इंदापूर तालुक्यात बुधवारी (दि.2) उघडकीस आला आहे. इंदापूर तालुक्यातील वरकुटे बुद्रुक येथे हा प्रकर उघडकीस आला आहे. याप्रकरणी पोलिसांनी दोघांवर गुन्हा दाखल करुन 2 लाख 11 हजार 300 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे.

पांडुरंग नामदेव कुंभार , नवनाथ गणपत शिंदे (दोघे रा. वरकुटे बुद्रुक, ता. इंदापूर) यांच्याविरुद्ध अंमली औषधिद्रव्य व मन:प्रभावी पदार्थ अधिनियम कायद्यानुसार इंदापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी पोलीस हवालदार सुरेंद्र जयवंत वाघ यांनी फिर्याद दिली आहे.

बुधवारी कुंभार आणि शिंदे यांच्या शेतातील विहिरीच्या कडेला ही अफूची झाडे भुईमुग आणि लसूण या पिकांमध्ये आंतरपीक म्हणून लागवड केल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आले. अफूचे (खसखस) ओल्या झाडाचे व बोंडाचे एकूण वजन 32 किलोग्रॅम असून, अफूच्या बोडांसह झाडांची एकूण किंमत अंदाजे 2 लाख 11 हजार 300 रुपये आहे. पोलिसांनी दोघांवर गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक टी.वाय. मुजावर यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक नागनाथ पाटील करीत आहेत.

बातमी शेर करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

स्वराज्य वार्ता मध्ये आपले स्वागत,आजच आमच्या यु ट्यूब चॅनलला सबक्राईब करा, व फेसबुक पेजला लाईक करा. स्वराज्य वार्ता उपलब्ध..डेली हंट,आणि कू,वर सर्व प्रकारच्या जाहिरात आणि बातम्यासाठी संपर्क-8888582858, 9145558551,आमचा अधिकृत व्हाट्सअप्प-9822222707,मेल-swarajyavarta@gmail.com…धन्यवाद.

error: Content is protected !!