अध्यक्षपदी मनीष बावणेर तर उपाध्यक्षपदी सौ. मुक्ता संदीप चव्हाण यांची नियुक्ती
दर्यापूर – महेश बुंदे
तालुक्यातील तोंगलाबाद येथील आयएसओ नामांकित डिजिटल जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या व्यवस्थापन समितीचे दि. ४ मार्च रोजी जिल्हा परिषद केंद्र प्रमुख पद्माकर खाडे यांच्या अध्यक्षतेखाली व पालक प्रतिनिधी, माजी सरपंच गजाननराव जऊळकार व अंतकला भीमराव अटंबर यांच्या उपस्थितीत गठण करण्यात आले. यामध्ये अध्यक्षपदी मनीष बावणेर तर उपाध्यक्षपदी सौ. मुक्ता संदीप चव्हाण यांची नियुक्ती करण्यात आली. तर सदस्यपदी संतोष प्रकाश साठे, उमेश रघुनाथ बायस्कार, अनिल श्रीकृष्ण जामनीक, सौ.सोनाली अनंता जऊळकार, सौ.सीमा सदानंद काळदाते, सौ.रुपाली दीपक धारपवार, सौ.शिल्पा सतीश अटंबर यांची नियुक्ती करण्यात आली तसेच शिक्षणतज्ञ म्हणून धनंजय माणिकराव देशमुख यांची नियुक्ती करण्यात आली आहे. सर्व नवनियुक्त अध्यक्ष व उपाध्यक्ष आणि सदस्य यांचे जिल्हा परिषद शाळेचे मुख्याध्यापक नंदकिशोर रायबोले व सहाय्यक शिक्षिका तेजस्विनी अटाळकर व आणि उपस्थित पालक यांनी अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
‘शिक्षणतज्ञ’ म्हणून धनंजय देशमुख यांची नियुक्ती