दर्यापूर नगर परिषद प्रशासनाविरोधात जागतिक महिला दिनी महिलाच बसणार आमरण उपोषणाला

दर्यापूर – महेश बुंदे

दर्यापूर नगरपरिषद हद्दीतील सांगळूदकर नगर परिसरात सांडपाण्याचे साम्राज्य पसरले असून वारंवार तक्रारी करून सुद्धा काहीही फायदा झाला नाही. एवढेच काय लोकप्रतिनिधी आमदार बळवंत वानखडे यांनी मुंबईला जायच्या अगोदर त्या ठिकाणी भेट दिली असता, संबंधित अधिकाऱ्याची बोलणं करून त्वरित बंदोबस्त करा, अशा सूचना दिल्या. तरीपण निगरगट्ट शासन थातुरमातुर कारवाई मशीन द्वारे पाणी काढण्याची तयारी दाखवून, त्यावर कायमस्वरूपी तोडगा निघावा यासाठी परिसरातील महिला ह्या जागतिक महिला दिन ८ मार्चला नगरपरिषद समोर आमरण उपोषणाला बसण्याचा इशारा दोन मार्चला लेखी स्वरुपात मुख्याधिकारी पराग वानखडे यांना देण्यात आला.

जागतिक महिला दिनी सौ. स्मिता संजय देशमुख, राजश्री रवींद्र भांबुरकर, सौ. नीलिमा रमाकांत राऊत, सौ. दीपिका प्रफुल धर्माळे पाटील, सौ. छाया रमेशराव काळे, सौ. नीता नंदकिशोर येवले, सौ. अरुणा माधवराव काळे, सौ. अंजली गजानन हरणे अशा एकूण आठ महिला ८ मार्चला नगरपरिषद दर्यापूर समोर आमरण उपोषणाला बसणार आहेत. नगराध्यक्ष सौ. नलिनीताई भारसाकळे ह्या महिला असून सुद्धा यांनी सांगळुदकर नगराला न्याय दिला नाही.

नगराध्यक्ष पदाच्या निवडणुकीमध्ये सर्वात जास्त मत नगराध्यक्ष सौ. नलिनीताई भारसाकळे यांना दिले होते, तरी त्यांनी गटारीसाठी न्याय दिला नाही, फक्त रोड नको तिथे रोडमात्र निर्माण केले आहेत, आता नगरपरिषद प्रशासन काय न्याय देते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

बातमी शेर करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

स्वराज्य वार्ता मध्ये आपले स्वागत,आजच आमच्या यु ट्यूब चॅनलला सबक्राईब करा, व फेसबुक पेजला लाईक करा. स्वराज्य वार्ता उपलब्ध..डेली हंट,आणि कू,वर सर्व प्रकारच्या जाहिरात आणि बातम्यासाठी संपर्क-8888582858, 9145558551,आमचा अधिकृत व्हाट्सअप्प-9822222707,मेल-swarajyavarta@gmail.com…धन्यवाद.

error: Content is protected !!