प्रतिनिधी सुनील बटवाल
चिंबळी दि ३(वार्ताहर ) मोशी येथील नागेश्वर महाराज उत्सवात गुरुवारी (दि.३) रोजी पार पडलेल्या लिलावात मानाचा विडा गणेश तुकाराम कुदळे यांनी 91 लाखाची बोली लावत मान मिळविला तर मानाची ओटी निलेश उद्धव बोराटे यांनी बोली लावून तब्बल ३९ लाख २०२२ रुपयाला मिळवली. सदर लिलावात बोली लावण्याचा मान सालाबादप्रमाणे केदारी कुटुंबाला देण्यात आला होता यामध्ये प्रामुख्याने नारायण केदारी,सागर केदारी, निखिल केदारी यांनी लिलावचे काम पाहिले.

कोरोनामुळे दोन वर्षे यात्रा मर्यादित स्वरूपातकरण्यात आली होती.यंदा मात्र जल्लोषात उत्सव साजरा करण्यात आला.परंपरे नुसार सर्व धार्मिक विधी,परंपरा पार पाडण्यात आल्या.परंपरेनुसार लिलाव उत्सव नागेश्वर महाराज सभामंडपामध्ये सकाळी १० वाजल्यापासून सुरू झाला.देवाच्या दारात पैशाला मोल नाही हेच खर याचा प्रत्यय करून देणारा हा लिलाव आहे हे त्या लिलावात सुरुवाती पासून शेवट पर्यंत बसणाऱ्या हमखास जाणवते.उत्सवातील वस्तूंचा लिलाव हा पंचक्रोशीतील भाविकांच्या दृष्टीने एक विशेष पर्वणीचा सण असतो.
