११ तासात २०० किमी अमरावती-मोर्शी-वरूड ते पुसला थरारक प्रवास करणारा शिक्षक सायकलपटू प्रकाश लिंगोट

दर्यापूर – महेश बुंदे

रक्तदाब आणि मधुमेहावर उपाय म्हणून डाॅक्टरानी जि. प. शिक्षक प्रकाश लिंगोट यांना सायकल चालविण्याचा सल्ला दिला. सल्लानुसार सायकल चालवायला सुरवात केल्यानंतर त्यांना सायकल चालवण्याचा छंद लागला. सायकलिंगच्या छंदातून आता ते नवनवीन विक्रम प्रस्थापित करीत आहेत. नुकत्याच झालेल्या अमरावती शहर पोलीस व वाशिम राॅन्डीनिअर्स क्लब द्वारे आयोजीत आजादी का अमृत महोत्सव अंतर्गत सायकल रॅलीत त्यांनी २०० कि.मी. अंतर फक्त ११ तासात पार केले.

रविवारी आयोजीत या सायकल रॅलीत विदर्भातील १२९ सायकल पटू सहभागी झाले होते. यामध्ये १८ ते ६४ वयोगटातील ११४ पुरुष तर १५ महिलाचा सहभाग होता. विषेश म्हणजे आंतरराष्ट्रीय सायकलपटू डाॅ. अमित समर्थ हे सुद्धा या रॅलीत सहभागी होते. दर्यापुर, अंजनगाव तालुक्या मधून शिक्षक प्रकाश लिंगोट हे एकमेव सायकलपटू या रॅलीत सहभागी होते. अमरावती-मोर्शी-वरूड ते पुसला या मार्गावरील २०० किलोमीटर अंतर त्यांनी निर्धारित वेळेच्या आत पार केले. पोलीस आयुक्त डाॅ. आरती सिंह, उपायुक्त एम.एम.मकानदार, विक्रम साळी, अमित समर्थ याचे उपस्थितीत सन्मानचिन्ह देवून त्यांचा गौरव करण्यात आला. दर्यापुर येथील रहिवासी असलेले प्रकाश लिंगोट हे सैदापूर येथे जि. प. शाळेत शिक्षक असून प्रयोगशिल शिक्षक म्हणून त्यांची परिसरात ओळख आहे. कोरोना काळात शाळा बंद असताना त्यांनी विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होवू नये म्हणून शासकीय नियमांचे पालन करीत विद्यार्थ्यांना त्याचे घरी जावून शिकवले.

सायकलिंगचा छंद जोपासत असताना विद्यार्थ्यांची शैक्षणिक गुणवत्ता कायम ठेवण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. सायकलिंग रॅलीत त्यांनी केलेल्या कामगिरी बद्दल अंजनगाव प. स. विस्तार अधिकारी शरद कान्हेरकर, विनोद पाटील, केंद्रप्रमुख प्रमोद वाठ, नितिन अविनाशे, गजानन येवूल यांचे हस्ते प्रकाश लिंगोट यांचा सत्कार करण्यात आला.

बातमी शेर करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

स्वराज्य वार्ता मध्ये आपले स्वागत,आजच आमच्या यु ट्यूब चॅनलला सबक्राईब करा, व फेसबुक पेजला लाईक करा. स्वराज्य वार्ता उपलब्ध..डेली हंट,आणि कू,वर सर्व प्रकारच्या जाहिरात आणि बातम्यासाठी संपर्क-8888582858, 9145558551,आमचा अधिकृत व्हाट्सअप्प-9822222707,मेल-swarajyavarta@gmail.com…धन्यवाद.

error: Content is protected !!