प्रतिनिधी सुनील बटवाल
चिंबळी दि ३ (वार्ताहर) पिंपरी चिंचवड महानगरपालिका हद्दीत असलेल्या च-होली येथील ग्रामस्थांचे ग्रामदैवत असलेल्या वाघेश्वर महाराजांच्या उत्साहा निमित्ताने सर्व मंदिरांना विद्युत रोषणाई करुन भव्य मंडप उभारण्यात आला होता .

उत्साहा निमित्ताने बुधवार दि २रोजी रोजी ग्रामस्थांच्या व यात्रा कमिटीच्या वतीने पहाटे महापुजा अभिषेक करून हारतुरे व मांडव डहाळे मिरवणूक काढण्यात आली व सकाळी ११ते सायंकाळी सहा वाजेपर्यंत भव्य बैलगाडा शर्यतीचे आयोजिन करण्यात आले होते.
या बैलगाडा शर्यती साठी खेड हवेली मावळ मुळशी शिरूर जुन्नर तालुक्यातील बैल गाडा मालकांनी सहभागी होऊन यात्रेची शोभा वाढवली होती गेल्या सात वर्षांपासून बैल गाडा शर्यतीला बंदी घालण्यात आली असल्याने खेळणी रहाडगाडे वाजंत्री गाडाशौकीण अनेक व्यावसायिक अडचणीत आले होते परंतु या वर्षी बैल गाडा शर्यतीवरची बंदी उठविण्यात आली
असल्याने संपुर्ण पुणे जिल्हात ग्रामीण भागात विविध गावांमध्ये यात्रा उत्सव सुरू होऊन बैल गाडा शर्यती सुरू करण्यात आल्या असल्याने गाडा शौकीन व व्यवसायिक आनंद व्यक्त करत असुन यात्रेची शोभा वाढत असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे.

च-होली येथे वाघेश्वर महाराजांच्या उत्साहा निमित्ताने आयोजित करण्यात आलेल्या बैलगाडा शर्यती मध्ये धावत असलेला फळी फोड गाडा


