Post Views: 571
(काँग्रेसच्या कांचनमाला पाटील गावंडे या विजयी)
दर्यापूर – महेश बुंदे
नुकत्याच पार पडलेल्या सेवा सहकारी सोसायटीच्या निवडणुकीमध्ये अरुण पाटील गावंडे यांच्या नेतृत्वात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे पॅनल बहुमताने निवडून आले, सर्वसाधारण कर्जदार मतदार संघातून प्रकाश पाटील गावंडे, बाबाराव खळबळकार, राजाभाऊ साखरे, बंडू पाटील गावंडे, प्रकाश विनायकराव देशमुख, महेंद्रसिंग मुंगणे, इत्यादी उमेदवार विजयी झाले, इतर मागास प्रवर्ग मतदारसंघातून प्रमोद श्रीराम वाकोडे, महिला राखीव मतदारसंघातून ज्योतीताई प्रभाकर नायसे, अनुसूचित जाती मतदार संघातून सदाशिवराव गावंडे, बहुमताने विजयी झाले .
तसेच भटक्या विमुक्त जाती प्रवर्गातून रमेश रामभाऊ घटाळे, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी प्रणित पॅनल कडून अविरोध निवडून आले संपूर्ण तसेच काँग्रेसच्या नेत्या श्रीमती कांचनमाला पाटील गावंडे, शेखर पाटील गावंडे, रोशन पाटील गावंडे हे सुद्धा निवडून आल्या आहेत दर्यापूर तालुक्यात चर्चेत असलेल्या व सर्वांचे लक्ष वेधून धरलेल्या सदर सेवा सहकारी सोसायटीच्या निवडणुकीत दहा विरुद्ध तीन मतांनी राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी प्रणित पॅनल विजय झालेले आहे. गड आला पण सिंह गेला असे म्हटल्यास वावगे होणार नाही कारण कोर्टाच्या निर्णयाने दोन दिवस अगोदर अरुण पाटील गावंडे यांचा फार्म रद्द झाल्याने ते निवडणुकीतून बाद झाले.