प्रतिनिधी फुलचंद भगत
वाशिम:-मा. पोलीस उपमहानिरीक्षक साहेब अमरावती, परिक्षेत्र अमरावती श्री. चंद्र किशोर मीणा (ips) यांचा नुकताच तीन दिवसीय वाशिम जिल्हा वार्षिक निरीक्षण दौरा कार्यक्रम पार पडला असुन या वार्षिक निरीक्षण निमीत्ताने मा पोलीस
उपमहानिरीक्षक यांनी दिनांक 25.02.2022 रोजी पोलीस स्टेशन कारंजा शहर येथे भेट दिली. त्यावेळी सर्व प्रथम पोलीस अधीक्षक श्री बच्चन सिंह(Ps) यांनी पुष्पगुच्छ देवुन स्वागत केले.

त्यानंतर पोलीस स्टेशन कारंजा शहर येथील ठाणेदार यांनी सलामी देवुन मानवदंना दिली. त्यानंतर पोलीस स्टेशन च्या कामकाजाचा आढावा घेण्यात आला असुन त्यामध्ये प्रलंबित गुन्हे, तसेच गंभीर गुन्हे यांचा आढावा घेवुन तपास अधिकारी/अंमलदार यांना मार्गदर्शन करण्यात आले.पोलीस अंमलदार व अधिकारी यांचे सोबत सवांद साधला. त्यानंतर उपविभाग मंगरूळपिर येथे वार्षिक निरीक्षण संबधाने भेट देवुन उपविभाग मंगरूळपिर यांच्या कामकाजाची पाहणी करून उपविभागातील सर्व प्रलंबित गुन्हयांचा आढावा घेण्यात आला तसेच उपविभागातील पोलीस अधिकारी यांच्या मुलाखती
घेवुन कामकाजा बाबत मार्गदर्शन केले.

दिनांक 28.02.2022 रोजी पोलीस स्टेशन वाशिम शहर चे वार्षिक निरीक्षण घेण्यात आले असुन त्यामध्ये पोलीस स्टेशन स्तरावरील कामाकाजाचा आढावा घेवुन तपासी अधिकारी व अंमलदार यांना मार्गदर्शन करून त्यांचे सोबत संवाद साधला. त्यानंतर ऊपविभाग वाशिम येथे भेट देवुन कामकाजाबाबत आढावा घेवुन उपविभागातील पोलीस अधिकारी यांच्या मुलाखती घेण्यात आल्या
असुन पोलीस अधिकारी यांना मार्गदर्शन करण्यात आले. त्यानंतर दुपारी 04.00 वा चे सुमारास पोलीस अधीक्षक कार्यालय वाशिम येथे गुन्हेसभेचे आयोजन करण्यात आले.
सदर गुन्हे सभेमध्ये वर्षभरातील वाशिम पोलीस दलाचे उत्कृष्ट कामगीरी बाबत, गुन्हे प्रतिबंधाबाबत, दोषसिध्दी तसेच पोलीस दलाचे वतिने राबविण्यात येत असलेले नाविण्यपुर्ण उपक्रम याबाबत पोलीस अधीक्षक श्री बच्चन सिंह(Ps) यांनी सादरीकरण केले. त्यादरम्यान वाशिम जिल्हयातील विस्तृत गुन्हे आढावा घेण्यात आला त्यामध्ये प्रामुख्याने प्रलंबित गुन्हे, गुन्हे तपास व दोषसिध्दी याबाबत आढावा घेण्यात आला. तसेच गुन्हेगारी कृत्यावर नियंत्रण व पाळत ठेवणारी प्रणाली व गुन्हेगारांना वेगवेगळया तिन स्तरावर चेंकीग साठी अवलंब करण्यात येणारी CRISP प्रणाली बाबत माहिती देण्यात आली. तसेच पोलीस स्टेशन स्तरावर व कार्यालयात येणारे तकारदार/अभ्यांगत यांच्या बाबत सेवा प्रणाली मध्ये नोंदी घेण्यात येतात व अशा तकारदार व अभ्यांगत यांचे तकारीची दखल पोलीस स्टेशन स्तरावरून पुर्तता झाली किंवा नाही याबाबतचा अभिप्राय घेण्यासाठी केंद्रीकृत पर्यवेक्षण करण्यासाठी पोलीस अधीक्षक कार्यालय वाशिम येथे प्रायोगिक तत्वावर स्वतंत्र ‘सेवा’ (S.E.V.A) कक्षाची स्थापना करण्यात आली असल्याबाबत माहिती देण्यात आली.

वाशिम जिल्हयाचे वतिने नागरीकांच्या सोयी साठी
तसेच सुरक्षेसाठी राबविण्यात येणा-या नाविण्यपुर्ण उपक्रमाची अंमलबजावणी उत्कृष्ट पध्दतीने होत असल्याने तसेच डायल 112 चे वतिने जनतेला त्वरीत मदत पोहचविण्यात येत असल्याने मा पोलीस उपमहानिरीक्षक अमरावती परिक्षेत्र विशेष कौतुक केले.
दिनांक 01.03.2022 रोजी सकाळी 07.30 वा समारंभीय कवायतीचे नविन पोलीस मुख्यालय वाशिम येथील मैदानावर आयोजन करण्यात आले होते. यावेळी संमारंभ कवायतीलचे परेड कंमाडर म्हणुन पोलीस अधीक्षक श्री बच्चन सिंह (IPS). सेंकड इन कंमाडर अपर पोलीस अधीक्षक श्री गोरख भामरे (IPS), प्लाटुन कंमाडर म्हणुन परि. सहायक पोलीस अधीक्षक महक स्वामी (ips). उपविभागीय पोलीस अधिकारी श्री जगदीश पांडे व इतर पोलीस अधिकारी हजर होते. यावेळी मा पोलीस उपमहानिरीक्षक श्री चंद्र किशोर मीणा (ips) यांनी परेडचे निरीक्षण करून पोलीसांनी केलेल्या कवायतीचे कौतुक केले. त्यानंतर पोलीस मुख्यालयाचे मैदानावर पिटी, स्कॉड ड्रिल, सेंट्री ड्रिल व इतर विविध क्लास चे प्रात्याक्षिक सादर केले. तसेच अचानक पोलीस दलाला एखादया कायदा व सुव्यवस्थेच्या प्रश्नाला सामोरे जातांना आवश्यक असलेली मॉब ड्रिल चे उत्कृष्टरित्या प्रात्याक्षिकाचे सादरीकरण करण्यात आले आहे.
