दर्यापूर – महेश बुंदे
सीताराम बाबा यांचे पदस्पर्शाने पावन झालेल्या करतखेड बाजार येथे दरवर्षी प्रमाणे या वर्षी सुद्धा सीताराम बाबा यांचा पुण्यतिथी महोत्सव साजरा करण्यात आला. या महोत्सव निमित्त संगीतमय भागवत व अखंड हरीनाम साप्ताहचे आयोजन संस्थानचे विश्वस्त व गावकऱ्यांच्या सहकार्यने यात्रा मोहत्सव आयोजित करण्यात आला होता.

या महोत्सवात श्रीमद भागवत सप्ताह काकडा आरती, हरिपाठ, हरिकीर्तन, अन्नदान, विधिवत होम, हवन सपन्न झाले. यावेळी लाभलेले भागवतकथा प्रवक्ता हरी भक्त पारायण बळीराम महाराज दोड (अकोला ) यांच्या अमृततुल्य वाणीतून हजारोच्या संख्येत भक्तीमय वातावरणात भाविकांनी भागवत कथा श्रवणाचा लाभ घेतला. हा भक्तिमय सोहळा दि. २३ फेब्रुवारी पासुन प्रारंभ झाला तर दि. २ मार्च सकाळी ९ वा भागवतचार्य बळीराम महाराज दोड यांचे काल्याचे कीर्तन व नंतर गावा मधुन श्री ची पालखी मिरवणूक शोभा यात्रा काढण्यात आली,.

शोभा यात्रेत विविध गावांचे महिला, पुरुष संप्रदायिक भजनी मंडळ, युवक युवती यांनी फुगडी, भारूड, पथनाट्य पाऊल्या सादर केल्या अक्षरषा परिसर भजनात न्हाहुन गेला होता. तसेच ढोलाचे भजन मंडळानी सुद्धा आपला सहभाग नोंदवीला होता या पालखी मिरवणूकीचा समारोप दहीहंडी व येणाऱ्या भजनी मंडळ लाभलेले सुप्रसिद गायनचार्य मृधुगांचार्य, यांचा सत्कार करण्यात आला.
