पिंपरी चिंचवड वार्ता :- “सामाजिक सुरक्षा विभाग यांचे पथकाने शासनाने प्रतिबंधीत केलेल्या तंबाखूजन्य गुटख्याची वाहतूक करून विक्री करणाऱ्या तसेच पैशावर स्वतःचे आर्थिक फायद्यासाठी जुगार खेळणाऱ्या व खेळविणाऱ्या इसमांविरुध्द कारवाई केलेबाबत मिळालेल्या माहितीनुसार “
पोलीस आयुक्त श्री कृष्ण प्रकाश पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालय यांनी पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीमध्ये अवैध धंद्यावर प्रतिबंध करण्याच्या अनुषंगाने माहिती काढुन कारवाई करणेबाबत आदेश दिल्याने सामाजिक सुरक्षा पथक हे पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीमध्ये अवैध धंद्यावर कारवाई करण्याच्या अनुषंगाने गोपनिय माहिती काढत असताना दिनांक ०१/०३/२०२२ रोजी वाकड पोलीस स्टेशन हद्दीत अवैधरित्या शासनाने प्रतिबंधीत केलेल्या तंबाखूजन्य गुटख्याची वाहतूक करुन विक्री करणाऱ्या इसमांवर तसेच देहूरोड पोलीस स्टेशन हद्दीत स्वतःचे आर्थिक फायद्यासाठी पैशावर जुगार खेळणाऱ्या इसमांवर व एका महिलेविरुध्द कारवाई करण्यात आली आहे.
दिनांक ०१/०३/२०२२ रोजी सामाजिक सुरक्षा विभागाचे पथकातील पोलीस अधिकारी व पोलीस अंमलदार यांनी वाकड पोलीस स्टेशन हद्दीत थेरगाव परिसरात एक सिलव्हर रंगाची स्कोड़ा कंपनीची कार नं एमएच १२ एफपी २१०६ हिचेमधुन एक इसम गुटख्याची वाहतूक करुन त्याची थेरगाव परिसरात स्वतःचे आर्थिक फायद्यासाठी विक्री करीत आहे. अशी गुप्त बातमीदाराकडून मिळालेल्या गोपनिय माहितीवरुन सामाजिक सुरक्षा विभागाचे पथकातील पोलीस अधिकारी व पोलीस अंगलदार यांनी फ्री मॅथॉडिस्ट चर्च चे समोर, सार्वजनिक डांबरी रोडवर, थेरगाव, वाकड, पुणे येथे सकाळी ०७:४० वा चे सुमारास सापळा रचुन छापा टाकुन खालील मुद्देमाल आरोपीच्या ताब्यात मिळुन आला त्याचे वर्णन खालील प्रमाणे आहे.
१) ३.६९०/- रु रोख रक्कम २) १,२५,८१०/- रु.किंचा शासनाने प्रतिबंधीत केलेला तंबाखूजन्य गुटखा. ३) ३.९०,०००/- रु किं ची स्कोडा कार जु.वा. किं.अं.असा एकुण ५,१९,५००/- रु किं चा मुद्देमाल मिळुन आला
म्हणुन इसम आरोपी १) हरिराम रत्नाराम बिष्णोई वय ३५ वर्षे रा. सुखसागर नगर, कोंढवा, पुणे मुळपत्ता गाव पादरु तहशील शिवाना जि. बाढ़मेर राज्य राजस्थान तसेच पाहिजे आरोपी नामे २) सागर पुर्ण नांव पत्ता माहित नाही यांचेविरुध्द वाकड पोलीस स्टेशन येथे गुरनं १५६ / २०२२ भादंवि कलम ३२८, २७२, २७३, १८८ ३४ प्रमाणे गुन्हा नोंद करण्यात आला असून पुढील तपास वाकड पोलीस स्टेशन करीत आहे.
तरोच दिनांक ०१/०२/२०२२ रोजी सामाजिक सुरक्षा विभागाचे दुराच्या पथकातील पोलीस अधिकारी व पोलीस अंमलदार यांनी देहूरोड पोलीस स्टेशन हद्दीत तळेगांव दाभाडे ता. मावळ जि. पुणे येथील जुना मुंबई-पुणे हायवे रोडवरील घोडेश्वर मंदिर डोंगराच्या खाली असलेल्या भेगडे यांच्या मोकळ्या जागेत पाकींगमध्ये काही पुरुष/महिला हे चिमणी पाखरु (सोरट) गुडगुडी नावाचा हार जितच्या जुगारावर लोकांना पैसे लावण्यास सांगुन पैशावर स्वतःचे आर्थिक फायद्यासाठी जुगार खेळ खेळत व खेळवित आहेत.
अशी गुप्त बातमीदाराकडून मिळालेल्या गोपनिय माहितीवरून सामाजिक सुरक्षा विभागाचे पथकातील पोलीस अधिकारी व पोलीस अंमलदार यांनी १६:३० वाजता सापळा रचुन छापा टाकुन खालील मुद्देमाल आरोपीच्या ताब्यात मिळुन आला त्याचे वर्णन खालील प्रमाणे आहे. (१) २३,८००/- रोख रक्कम २)००,००/-रु.किं.चे जुगार खेळण्याचे साहित्य.असा एकुण २३,८००/- रु किं चा मुद्देमाल मिळुन आला.
म्हणुन इसम आरोपी १) शमशुद्दीन दौलसा शेख वय ४६ वर्षे रा. घर नंबर ९३५/९३६ पाटील इस्टेट, गल्ली नंबर १०, शिवाजीनगर, पुणे (जुगार चालक-मालक) २) मुल्ला गुलाब शेख वय ६२ वर्षे रा. गल्ली नंबर ०९ पाटील इस्टेट, शिवाजीनगर, पुणे (जुगार चालक-मालक) ३) संजय जनार्धन पंडित वय ५८ वर्षे रा. गायकवाड सरपंच यांच्या भाड्याचे खोलीत, आयप्पा मंदिर समोर, उत्तमनगर, पुणे (जुगार चालक-मालक) ४) बाळु गणपत भिसे वय ५० वर्षे रा. राणा कॉलनी, मार्केट यार्ड जवळ, बार्शी जि. सोलापूर (जुगार चालक-मालक) ५) अविनाश सुरज शिंदे वय २७ वर्षे रा. घर नंबर ५२ करें नगर, वनदिये मंदिरासमोर, कर्वेनगर, पुणे (जुगार चालक-मालक) ६) एक महिला (जुगार चालक-मालक ) ७) कल्लप्पा भिमशाह डांगे वय ४४ वर्षे रा. मारुती मंदिर चौक जवळ निळकंठ नगर, तळेगांव ता. मावळ जि. पुणे (जुगार चालक मालक) यांचेविरुध्द देहूरोड पोलीस स्टेशन येथे गुरनं ११७/२०२२ महाराष्ट्र जुगार अधिनियम १८८७ चे कलम १२ (अ) प्रमाणे गुन्हा नोंद करण्यात आला असून पुढील तपास देहूरोड पोलीस स्टेशन करीत आहे.
वरील दोन्ही कारवाईमध्ये एकुण ५,४३,३००/- रु.किं.चा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.