भावी नगरसेवक प्रोफेसर थामराज नरेंद्र घोरसाड यांच्यामार्फत महाशिवरात्री निमित्त गोपाल नगर तसेच निंभोरा येथे महाप्रसादाचा कार्यक्रम घेण्यात आला.
प्रतिनिधी /जयकुमार बुटे
अमरावती वार्ता :- श्री. राष्ट्रसंत माऊली मंडळ, पवन नगर न. 2 , गोपाल नगर, अमरावती चे सदस्य तसेच भावी नगरसेवक प्राध्यापक थामराज नरेंद्र घोरसाड यांनी आज दिनांक,01 /03/2022 रोजी महाशिवरात्री निमित्त सर्व गोपाल नगर तसेच निंबोरा येते भोले नाथांचा महाप्रसाद चा कार्यक्रम आयोजित करण्यात आला तसेच सर्व महाकाळ भक्तांनी संपूर्णपणे महाप्रसादाचा लाभ घेतला तसेच भावी नगरसेवकांना आशीर्वाद सुद्धा दिले श्री. राष्ट्रसंत माऊली मंडळ मागील दरवर्षीप्रमाणे महाशिवरात्रीनिमित्त सगळ्या नागरिकांना उसळ तसेच केळी फ्रुट चा महाप्रसाद चा वाटप करण्यात येते या वर्षीसुद्धा वाटप करण्यात आला.
कार्यक्रमाचे आयोजकभावी नगर नगरसेवक प्रा. थामराज नरेंद्र घोरसाड, तसेच मंडळांचे सदस्य व सहकारी संजय भाऊ मेटकर, .नितीन भाऊ माहुलकर, पंकज भाऊ मालोदे, सचिन भाऊ शेटे, नंदकिशोर नागे, महेंद्र महाजन, प्रवीण राठोड, नितीन ऊगोकार, रवी राऊत, अमित तिडके, जीवन घोरसाड , प्रवीण शिंदे व सर्व राष्ट्रसंत माऊली मित्र मंडळ. महाशिवरात्री निमित्त सर्व गोपाळ नगर नागरिकांना व निंबोरा या परिसरात महाप्रसादाचा कार्यक्रम ठरविण्यात आला होता.