चाकण | उदमांजराची विहिरीतून सुखरूप सुटका ; पहा रेस्क्युअर व्हिडिओ

चाकण :- चाकणपासून जवळ असणाऱ्या संतोष नगर भाम येथील रोहिदास कड यांच्या विहिरीत रात्रीपासून एक वेगळाच प्राणी पडल्याची बातमी परिसरात पसरली अनेकांनी तेथे जाऊन तो शेकरू अगर बिबट्याचे पिल्लू असल्याचे छातीठोकपणे सांगितले वाकी येथील पत्रकार आदेश टोपे यांनी चाकण येथील रेस्क्युअर बापूसाहेब सोनवणे यांना संपर्क केल्यानन्तर त्यांनी ते उदमांजर cevet cat असल्याचे सांगितले.हा प्राणी निशाचर असून हा मृतदेह उकरून खातो अशी यांच्याबद्दल वदंता असल्यामुळे गैरसमजातून याला मसण्या उद म्हणतात अशी माहिती त्यांनी पुरवली.

त्याच्या सुटकेसाठी बापूसाहेब यांनी चाकण वनपरिक्षेत्र अधिकारी श्री.योगेश महाजन व खेड वनपरिक्षेत्र अधिकारी श्री.रौन्धळ यांना संपर्क केला असता खेडच्या वतीने वनरक्षक चौधरी मॅडम यांच्यासोबत वनमजुर भोगाडे आणि चाकण च्या वतीने वनरक्षक गवळी यांनी वनमजुर खांडेभराड यांनी जाऊन प्राणीमित्र ,योगगुरू बापूसाहेब सोनवणे यांच्यासोबत एक तासांच्या अथक प्रयत्नांनी उदमांजराची विहिरीतून सुखरूप सुटका केली.

बातमी शेर करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

स्वराज्य वार्ता मध्ये आपले स्वागत,आजच आमच्या यु ट्यूब चॅनलला सबक्राईब करा, व फेसबुक पेजला लाईक करा. स्वराज्य वार्ता उपलब्ध..डेली हंट,आणि कू,वर सर्व प्रकारच्या जाहिरात आणि बातम्यासाठी संपर्क-8888582858, 9145558551,आमचा अधिकृत व्हाट्सअप्प-9822222707,मेल-swarajyavarta@gmail.com…धन्यवाद.

error: Content is protected !!