दर्यापूर – महेश बुंदे
श्री शिवाजी शिक्षण संस्था संचालित दर्यापूर येथील जे. डी. पाटील सांगळूदकर महाविद्यालयात नुकताच राष्ट्रीय विज्ञान दिवस साजरा करण्यात आला. तसेच नोबेल पुरस्काराने सन्मानित सी. व्ही रमण यांच्या प्रतिमेचे पूजन करून त्यांच्या संशोधनाच्या स्मृतींना उजाळा देण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य डॉ. दीनदयाल ठाकरे हे होते.

कार्यक्रमात प्रमुख पाहुणे ऑनलाइन डॉक्टर मिनाल गुप्ता, भौतिकशास्त्र विभाग, शारदा युनिव्हर्सिटी नवी दिल्ली व डॉक्टर योगेश कुमार भौतिकशास्त्र विभाग, गव्हर्नमेंट कॉलेज पलवल, हरियाणा, विज्ञान विभाग प्रमुख डॉ. विजय येलकर आदी उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक व राष्ट्रीय विज्ञान दिवसाचे महत्व विज्ञान विभाग प्रमुख डॉ. विजय येलकर यांनी आपल्या भाषणात विद्यार्थ्यांना विषद केले. विज्ञानाचा उपयोग जीवनाचा भाग होणे गरजेचे असून आपल्या वागण्या-बोलण्यातून विज्ञान दिसायला हवे असे प्रतिपादन प्राचार्य डॉ. ठाकरे यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणामध्ये केले. या कार्यक्रमाप्रसंगी महाविद्यालयांमध्ये विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
