आमदार बळवंत वानखडे, समाजसेवक रामुशेठ मालपाणी यांचा पुढाकार
दर्यापूर – महेश बुंदे
एरंडगाव येथील रत्नदीप उमाळे यांच्या घरी मध्यरात्रीच्या सुमारास अचानक आग लागली. या वेळी घरातील बहुतांश वस्तूंचे नुकसान झाले. अतिशय दुर्दैवी अशी ही घटना. आग काही काळाने शांत झाली खरी, पण बरंचस नुकसान करून गेली. अशा वेळी समाजसेवकात असलेली माणुसकी पुन्हा एकदा दिसून आली.

आमदार बळवंत वानखडे, समाजसेवक रामूसेठ मालपाणी यांच्या लक्षात आलं, की या कुटूंबाच्या घरात मोठी कमाई करणारं असं कोणी नाही. तसंही आग लागल्यामुळे नुकसान झालं की किती भुर्दंड पडतो हे आपण ऐकलं असेल, पाहिलं असेल किंवा कदाचित स्वतःच्या उदाहरणावरून अनुभवलं ही असेल.
