प्रतिनिधी सुनील बटवाल
चिंबळी दि१( वार्ताहर) खेड तालुक्यातील औद्योगिक क्षेत्रात असलेल्या दक्षिण भागातील चिंबळी कुरुळी परिसरात मोई निघोजे चाकण मरकळ भागात महाशिवरात्री निमित्त विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.
महाशिवरात्री निमित्त कुरुळी येथे महादेव मंदिराला विद्युत रोषणाई करुन भव्य मंडप उभारण्यात आला होता तर पहाटे पाच ते सात ५१ जोडप्याचा उपस्थिती मध्ये महारूद्र अभिषेक व आरती करून सर्व भाविकांना महाप्रसाद वाटप करण्यात आला .

यावेळी सकाळ पासूनच भाविकांनी दर्शनासाठी गर्दी केली होती तर दिवसभर मंदिरात विविध भजनी मंडळाच्या वतीने संगीत भजनांचा व एकतारी भजनांचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता तर चिबळी येथे ही महाशिवरात्री निमित्त ग्रामस्थांच्या व यात्रा कमिटीच्या वतीने महादेव मंदिरात पहाटे महापुजा व अभिषेक करून महाप्रसाद वाटप करण्यात आला व संगीत भजनांचा कार्यक्रम ठेवण्यात आला होता तर निघोजे येथील शिवपार्वती मंदिरात पहाटे महापुजा व अभिषेक करून महाप्रसाद वाटप करण्यात आला यावेळी सर्व भाविकांनी दर्शनासाठी दिवस भर लाभ घेतला.

