मोशी येथील शेतकरी  गुलाब बनकर यांच्या शेतात प्रायोगिक तत्वावर हळद पीक लागवड यशस्वी

बातमी संकलन सुनील बटवाल

चिंबळी  दि१ (वार्ताहर)  मोठ्या प्रमाणात शहरीकरण होत असलेल्या मोशी सारख्या उपनगरात आगळे वेगळे प्रयोग देखील होऊ लागले असून याभागात न पिकविले जाणारे हळदीसारखे पीक घेण्याचा प्रायोगिक प्रयोग मोशी भागात यशस्वी होण्याचा मार्गावर आहे.

 मोशी येथील शेतकरी  गुलाब बनकर यांच्या शेतात प्रायोगिक तत्वावर जून मध्ये हळद लागवड करण्यात आली होती.आता एक महिन्यात पीक काढण्यास येईल.

हळद आणि आले हे पीक प्रामुख्याने सांगली, सातारा जिल्ह्यात घेतले जाते.बनकर यांनी हे पीक घेण्याचे धाडस करून, हा प्रयोग यशस्वी केला असून येत्या एक महिन्यात पीक पक्व होऊन विक्रीसाठी बाजरात आणणार आहेत.
मध्यंतरी अवकाळी पावसाचे आणि धुक्याचे मोठे संकट आले होते, त्यावर मात करण्यास त्यांना यश मिळाले आहे.

शेतकरी गुलाब बनकर यांनी सांगितले की  हे पीक सेंद्रिय, नैसर्गिक आणि जैविक पद्धतीने उत्पादित होत आहे. त्यामध्ये देशी गाईचे शेणखत, जीवामृत, गोकृपा अमृत, दशपर्णी अर्क, आंबट ताक, गूळ, गोमूत्र,विविध जीवाणूंचा समूह वापरून हे पीक घेतले आहे. पि.चि. ह्या शहराच्या भागात शेती करणे जिकरीचे झाले आहे. ह्या भागात शेत मजुर शेती कामासाठी मिळत नाही.त्यावर उपाय म्हणून पत्नी सुरेखा बनकर आम्ही दोघेही द्विपदवीधर असूनही,स्वतःच  पतिपत्नी शेतात काम करून आनंद घेत असतो. निसर्गाच्या सानिध्यात सतत राहिल्या मुळे शारीरिक आजार येतच नाही. विषमुक्त शेती उत्पादन करून विकली जातात, त्याचेही समाधान मिळते.

एकंदरीतच शहरीकरण वाढत असलेल्या आणि विशेषता ऊस,भुईमूग,सोयाबीन,कांदा,गहू,भात आदी पिके प्रामुख्याने घेतले जात असलेल्या मोशी भागात हा आगळा प्रयोग आहे. या पिकाला लागवडीची पाहणी करण्यासाठी शेतकरी या ठिकाणी भेट देत आहेत.विशेषता सातारा जिल्ह्यात वाई भागात दिसणारे हे पीक आता शहरात आणि तेही मोशी भागात लागवड केले पाहायला मिळत असल्याने शेतकरी आवर्जून याची पाहणी करण्यासाठी येत आहेत.

बातमी शेर करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

स्वराज्य वार्ता मध्ये आपले स्वागत,आजच आमच्या यु ट्यूब चॅनलला सबक्राईब करा, व फेसबुक पेजला लाईक करा. स्वराज्य वार्ता उपलब्ध..डेली हंट,आणि कू,वर सर्व प्रकारच्या जाहिरात आणि बातम्यासाठी संपर्क-8888582858, 9145558551,आमचा अधिकृत व्हाट्सअप्प-9822222707,मेल-swarajyavarta@gmail.com…धन्यवाद.

error: Content is protected !!