चंद्रपूर | सांडपाणी देत आहे वृक्षलागवडीला जीवनदान

दर्यापुर – महेश बुंदे

तालुक्यातील खल्लार नजीक असलेल्या चंद्रपूर येथे मग्रारोहयो अंतर्गत वर्ष २०२१-२२ मध्ये वृक्षलागवड करण्यात आली आहे. पंचायत समिती दर्यापूर मार्फत १४०० रोपांपैकी वडगाव फत्तेपुर तसेच सावरपाणी येथील रोपवाटिकेतून १२५० रोपांची आयात करण्यात आली आहे. लागवड केलेल्या रोपांना पाण्याची पूर्तता वेळेवर करणे अतिशय गरजेचे झाले होते. वृक्षलागवडीच्या कामावर असलेल्या मजूर वर्गाने तसेच ग्रामरोजगार सेवकाने लागवड केलेल्या रोपांच्या संगोपनाकरिता अनोखा उपक्रम राबवत आहेत.

आता उन्हाळा प्रारंभ झाला असून तापमान वाढायला लागले आहे. अशातच गावालगत असलेली चंद्रभागा नदी वृक्षलागवडी पासून मोठ्या अंतरावर असल्यामुळे, नदीपात्रातून पाणी आणणे शक्य दिसून येत नसल्यामुळे मजूर वर्गाची पाण्याकरिता भटकंती प्रारंभ झाली होती. ज्यामुळे लागवड केलेल्या रोपांना पाण्याची अत्यंत गरज भासत होती. परंतु आता संपूर्ण उन्हाळा संपेतोवर पाण्याची टंचाई भासणार नाही. कारण गावातील सांडपाण्याची नाली मजुरांनी वर २०१८-१९ च्या वृक्षलागवड ठिकाणापर्यंत खोदत आणून शेवटी एक मोठा खड्डा खोदला आहे. ज्यामुळे अर्ध्या गावाचे सांडपाणी वाहत येऊन त्या खड्ड्यात जमा होते. व तेथूनच हे पाणी संपूर्ण लागवड केलेल्या रोपांना मजुरांमार्फत टाकल्या जाते.

चंद्रपूर येथील वृक्षलागवडीला लागणाऱ्या कसल्याही मदतीकरिता ग्रामपंचायत चंद्रपूर येथील सरपंच सौ वंदना बावणे, ग्रामसेवक किरण बुरघाटे तसेच जिजाबाई कांबळे (सदस्य), माजी पोलीस पाटील पुत्र ऋषीराज शेखावत, पोलीस पाटील महेंद्र मेश्राम, गातंमु समिती अध्यक्ष डॉ चंचल गजभिये यांचा नेहमी पुढाकार असतो. ग्रामपंचायत चंद्रपूर येथील वृक्षलागवडीमधील रोपांच्या संगोपनाला यशस्वीरित्या चालविण्यास पंचायत समिती येथील सहाय्यक कार्यक्रम अधिकारी किरण कराळे, तांत्रिक सहाय्यक अजय वानखडे, संदीप कांडलकर यांचे मार्गदर्शन लाभले असून कामावरील मजूर वर्ग तसेच ग्राम रोजगार सेवक यांची मोलाची भूमिका आहे.

बातमी शेर करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

स्वराज्य वार्ता मध्ये आपले स्वागत,आजच आमच्या यु ट्यूब चॅनलला सबक्राईब करा, व फेसबुक पेजला लाईक करा. स्वराज्य वार्ता उपलब्ध..डेली हंट,आणि कू,वर सर्व प्रकारच्या जाहिरात आणि बातम्यासाठी संपर्क-8888582858, 9145558551,आमचा अधिकृत व्हाट्सअप्प-9822222707,मेल-swarajyavarta@gmail.com…धन्यवाद.

error: Content is protected !!