अंजनगाव सुर्जी येथील भाजपा महिला जिल्हाध्यक्ष यांचा रविवार दिनांक २७ फेब्रवारी रोजी रात्री ९ वाजताच्या सुमारास दर्यापूर रोडवरील तामसवाडी फाट्यानजीक दुचाकीचा अपघात झाला या अपघातात महिला जिल्हाध्यक्षा यांच्या हात व पायाला गंभीर दुखापत झाली त्यांना दर्यापूर उपजिल्हा रुग्णालयात भरती करण्यात आले होते परंतु गंभीर दुखापत झाल्याने त्यांना अमरावती जिल्हा रुग्णालयात पाठविण्यात आले.
याची माहिती शिवसेना तालुका प्रमुख गोपाल अरबट यांनी दिनांक २८ फेब्रवारी रोजी सकाळी दिली. भाजपा महिला जिल्हाध्यक्ष सौ. अर्चना पखान व त्यांचे पती संजय पखान हे अमरावती वरुन रात्री येत असताना समोरुन येणाऱ्या दुचाकी सोबत यांच्या दुचाकीची अमोरा समोर धडक झाली. धडक लागल्याने अर्चना पखान या गाडीवरून रस्त्याच्या कडेला पडल्या व त्यांच्या हाताला व पायाला गंभीर दुखापत झाली. याची माहिती शिवसेना तालुकाध्यक्ष गोपाल अरबट यांना होताच त्यांनी अर्चना पखाण यांना दर्यापूर उपजिल्हा रुग्णालयात आणले परंतू गंभीर दुखापत असल्याने त्यांना अमरावती येथे पाठविण्यात आले.