अटी-शर्तीशिवाय आळंदीला पाणीपुरवठा योजना मंजूर करण्यात आली : महापौर मुरलीधर मोहोळ

प्रतिनिधी सुनील बटवाल

आळंदी वार्ता- : संतश्रेष्ठ श्री.ज्ञानेश्वर माऊलींच्या श्री.क्षेत्र आळंदीत भामा आसखेड पाणी योजनेतून विशेष पाणीपुरवठा योजना मंजूर करण्यात मोलाची भूमिका बजाविणारे असे पुणे महापालिकेचे महापौर मुरलीधर मोहोळ यांचा समस्त आळंदीकर नागरिक आणि महाराज मंडळीच्या वतीने माऊलींच्या मंदिरात जाहीर नागरी सन्मान करण्यात आला.
यावेळी बोलताना महापौर मुरलीधर मोहोळ म्हणाले की खरं तर ही योजना मंजूर करण्यात मी केवळ निमित्तमात्र होतो,कारण आळंदीकरांच्या सामूहिक पाठपुराव्याचेच हे यश आहे.

हभप नारायण महाराज जाधव यांच्या हस्ते वारकरी संप्रदायाचा फेटा,संत ज्ञानेश्वर महाराज मूर्ती देऊन सन्मानित केले.आजवर अनेक सन्मान स्विकारण्याची संधी मिळाली,मात्र माऊलींच्या मंदीरात आणि आईच्या उपस्थितीत झालेला हा सन्मान कायम स्मरणात राहील.आळंदी शहराला पाणी देण्याच्या या निर्णयाला खरंतर कोणाचाही विरोध नव्हता,तरीही प्रशासकीय पातळीवर ही मागणी पूर्ण करण्यासाठी विशेष पाठपुरावा करावा लागला.त्यानंतर कोणत्याही अटी-शर्तीशिवाय आळंदीला पाणीपुरवठा योजना मंजूर करण्यात आली.

विशेष योगायोग म्हणजे त्याच दिवशी आळंदी शहराला जलसंपदा विभागाकडून स्वतंत्र पाण्याचा कोटा मंजूर करण्यात आला आणि आळंदीला स्वतःचे हक्काचे पाणी मिळाले.आळंदीच्या नगराध्यक्षा वैजयंता उमरगेकर आणि संजय घुंडरे यांनी अनेक वेळा महापालिकेत येऊन हे काम मार्गी लावावे यासाठी पुढाकार घेतला आणि आळंदीतील नागरिक,भाविक आणि वारकऱ्यांना हा पाणीपुरवठा मंजूर झाला,याचे मला आत्मिक समाधान आहे असे महापौर मोहोळ यांनी सांगितले.


यावेळी नगराध्यक्ष वैजयंता उमरगेकर,हभप चैतन्य महाराज लोंढे,आध्यात्मिक विकास आघाडीचे पश्चिम महाराष्ट्र प्रमुख हभप संजय महाराज घुंडरे,माजी सभापती डी.डी.भोसले,जिल्हा परिषद सदस्य अतुल देशमुख,माजी नगराध्यक्ष बबनराव कुऱ्हाडे,सचिन पाचुंदे,शारदा वडगावकर,हभप भाऊमहाराज फुरसुंगीकर,माऊली वीर, नगरसेवक प्रशांत कुऱ्हाडे,सचिन गिलबिले,सागर बोरुंदिया,सचिन काळे,माजी नगरसेवक दिनेश घुले,अशोकराव उमरगेकर,नंदकुमार कुऱ्हाडे,वासुदेव घुंडरे,भाजपचे शहराध्यक्ष किरण येळवंडे,अजित वडगावकर,गणेश कु-हाडे,भागवत आवटे,गुलाबराव खांडेभराड,माऊली बनसोडे,पांडुरंग ठाकुर,आसाराम महाराज बडे,पंडित महाराज क्षीरसागर तसेच महाराज मंडळी आणि आळंदीकर नागरिक उपस्थित होते.

बातमी शेर करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

स्वराज्य वार्ता मध्ये आपले स्वागत,आजच आमच्या यु ट्यूब चॅनलला सबक्राईब करा, व फेसबुक पेजला लाईक करा. स्वराज्य वार्ता उपलब्ध..डेली हंट,आणि कू,वर सर्व प्रकारच्या जाहिरात आणि बातम्यासाठी संपर्क-8888582858, 9145558551,आमचा अधिकृत व्हाट्सअप्प-9822222707,मेल-swarajyavarta@gmail.com…धन्यवाद.

error: Content is protected !!