सोशल मिडियावर महिलेचे बनावट अकाऊंट बनवणार्‍या आरोपीस अटक,वाशिम शहर पोलिसांची कारवाई

वाशिमच्या महिलेचे बनावट इंस्टाग्राम खाते बनविणे पडले महागात

प्रतिनिधी फुलचंद भगत

वाशिम:-सोशल मीडियावर बनावट अकाउंट तयार करून वृध्द ते बालकपर्यंत लुबाडण्याचा धंदा सुरू आहे सोशल मिडीयाचा कोण कसा गैरफायदा घेईल याचा काही नेम नाही. अशाप्रकारे मध्यप्रदेशातील एकाला वाशिमच्या महिलेचे इंस्टाग्रामवर बनावट अकाउंट तयार करणे चांगलेच महागात पडले असून त्याच्यावर जेलची हवा खाण्याची पाळी आली आहे.सदर प्रकरणात एकास वाशिम शहर पो.स्टे.ने अटक केली आहे.

पोलिस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार मध्यप्रदेश राज्यातील खितोला,तहसिल सिहोरा,जि.जबलपुर येथील ऊत्सव संतोष खंपरीया राज्य याने इंस्टाग्राम या सोशल मिडीया साईटवर वाशिम शहरातील महिलेचे बनावट अकाउंट तयार करुन मोबाईल वरील व्हॉट्सॲप वर शिवीगाळ करुन धमकी दिली. दि.३१ नोव्हेंबर २०२१ रोजी महिलेच्या फिर्यादीवरून वाशिम शहर पोलिस ठाण्यात अप.क १३४५/२०२१ कलम ६६ ( C ) ६६ ( E ) ६७ माहिती तंत्रज्ञान अधिनियम २००० सहकलम ५०६ भा दं.वि. अन्वये नोंद करण्यात आला.

पोलीस अधिक्षक बच्चन सिंह यांच्या मार्गदर्शनाखाली वाशिम शहर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक रफीक शेख यांनी सदर गुन्हयाच्या तपासात आरोपी उत्सव संतोष खंपरीया,रा.खितोला बजार,तहसिल सिहोंरा,जि.जबलपुर राज्य मध्यप्रदेश याला दि २७/०२/२०२२ रोजी अटक करण्यात आली आहे.महिला संबंधी सोशल मिडीयावर आक्षेपार्ह पोस्ट करणे,बनावट अकाउंट तयार करणे,महिला व मुलींना सोशल मिडीयाचे माध्यमातुन त्रास देणे असे कत्य करणारे गुन्हेगारावर कठोर कारवाई करण्यात येत आहे.

कोणतेही महिला व मुलींना त्रास झाल्यास त्यांनी पोलीस स्टेशनला तकार देण्यात यावी जेणेकरुन सोशल मिडीयावर असे कृत्य करणाऱ्या गुन्हेगारावर कठोर कारवाही गुन्हयास प्रतीबंध करण्यात येईल असे आवाहन पोलीस विभागातर्फे करण्यात आले आहे.

सदरची कार्यवाही मा पोलीस अधिक्षक बच्चन सिंह,अपर पोलीस अधिक्षक,गोरख भामरे,उपविभागीय पोलीस अधिकारी सुनिलकुमार पुजारी यांच्या मार्गदर्शनाखाली ठाणेदार रफीक शेख ,पोहेकॉ विजय घुगे,पो.कॉ अमोल इरतकर आदींच्या पथकाने केली.

बातमी शेर करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

स्वराज्य वार्ता मध्ये आपले स्वागत,आजच आमच्या यु ट्यूब चॅनलला सबक्राईब करा, व फेसबुक पेजला लाईक करा. स्वराज्य वार्ता उपलब्ध..डेली हंट,आणि कू,वर सर्व प्रकारच्या जाहिरात आणि बातम्यासाठी संपर्क-8888582858, 9145558551,आमचा अधिकृत व्हाट्सअप्प-9822222707,मेल-swarajyavarta@gmail.com…धन्यवाद.

error: Content is protected !!