घरफोडी करणारा आंतरराज्यीय अट्टल गुन्हेगार मोर्शी स्थानिक गुन्हे शाखाकडुन जेरबंद

रवी मारोटकर ब्युरो चीफ

अमरावती वार्ता :- अचलपुर येथील पोलीस अधिकारी यांच्या घरी व मोर्शी हददीतील बंदघराची पाहणी करुन घरफोडी करणारा आंतरराज्यीय अट्टल गुन्हेगार स्थानिक गुन्हे शाखाकडुन जेरबंद

आरोपी नामे – सल्लु ऊर्फ सलीम ऊर्फ भुरेखॉ नुर खॉ, वय ४० वर्ष रा. इंद्रा कॉलनी बैतुल पोलीस स्टेशन मोर्शी येथे फिर्यादी अब्दुल रफीक अब्दुल सलाम रा. मोशी यांनी पोस्टे ला येवून दिनांक ०३/०२/२०२२ रोजी तक्रार दिली की, ते कामा निमीत्त घर बंद करुन बाहेरगावी गेले असता कोणीतरी अज्ञाताने घरातील लोखंडी खीडकी वाकवुन घरातील सोन्याचे दागीने व नगदी असा एकूण ४५००० रुपयांचा मुद्देमाल चोरुन नेला. वरुन पोलीस स्टेशन मोशी येथे अपराध क्रं ६२ / २०२२ कलम ४५४,४५७,३८० भादवि अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला.

त्या अनुषंगाने अमरावती ग्रामीण जिल्हयात वाढत्या घरफोडीच्या घटना पाहता मा. पोलिस अधिक्षक श्री. अविनाश बारगळ यांनी स्थानिक गुन्हे शाखा यांना गुन्हे उघडकीस आणनेबाबत निर्देशित केले होते. त्या अनुषंगाने दिनांक २८/०२/२०२२ रोजी स्थानिक गुन्हे शाखा पथक मालमत्तेचे गुन्हे उघडकीस आणण्याकरीता पो.स्टे. मोशी, वरुड हद्दीत पेट्रोलींग करीत असता गुप्त बातमीदाराकडुन खात्रीलायक बातमी मिळाली की,

ग्राम मोर्शी येथील अब्दुल रफीक अब्दुल सलाम यांचे घरातील चोरी ही आरोपी नामे सल्लु ऊर्फ सलीम याने केली असुन तो दर्यापुर येथे अंजनगाव टी पॉईट वर एका पाढ-या रंगाच्या कार मध्ये येवून थांबला आहे. अशा गोपनिय माहीती वरुन पो.स्टॉफ व पंचा सह दर्यापुर येथे अंजनगाव टी पांईट वर जावुन पाहणी केली असता एक पाढ-या रंगाची ईडीका हिंदी का व्हीस्टा गाडी दिसुन आली. त्या गाडीजवळ एक ईसम उभा असलेला दिसला त्यास पो स्टॉफच्या सहायाने सापळा रचुन नमुद आरोपीस ताब्यात घेतले. त्यास अधिक विश्वासात घेवून विचारपुस केली असता त्याने पोलीस अधिकारी रा. अलकरीम कॉलनी अचलपुर, रेहान कॉलनी व लक्ष्मीनगर मोर्शी येथील बंद घराची राजी दरम्यान पहाणी करुन दरवाज्याचा कुलुप कोंडा तोडुन चोरी केल्याची कबुली दिली.

सदर आरोपीकडुन सोन्याच्या दागीने २७.५ ग्राम की अं १,३७,००० रु तसेच गुन्हयात वापरलेले दोन वाहण किमत अंदाजे २,८०,००० रुपये असा एकुन ४,१९,९५० रु चा माल जप्त करण्यात आली आहे.

नमुद आरोपी कडुन नमुद आरोपीकडुन पोलीस स्टेशन मोशी १. अपराध नं ६२ / २०२२ कलम ४५४,४५७,३८० भादवि २. अपराध क्रं २७/२०२२ कलम ४५४,४५७,३८० भांदवि. ३. पोलीस स्टेशन अचलपुर अपराध क्रं ४० / २०२२ कलम ४५४,४५७,३८० भांदवि चे गुन्हे उघडकीस आणले.तसेच नमुद आरोपी सराईत गुन्हेगार असुन त्याने अमरावती शहर येथील दरोडा चोरीचे गुन्हे केल्याची कबुली दिली आहे. त्याचे कडुन आणखी गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता आहे.

सदरची कार्यवाही मा.पोलीस अधिक्षक श्री. अविनाश बारगळ, मा. अपर पोलीस अधिक्षक श्री. शशीकांत सातव यांचे मार्गदर्शनात पोलीस निरीक्षक श्री. तपन कोल्हे, स्थानिक गुन्हे शाखा अमरावती ग्रामीण यांचे नेतृत्वात पो.उप.नि. आशिष चौधरी, स.पो.उप.नि. संतोष मुंदाने, नापोकों रविंद्र बावणे, दिपक सोनाळेकर, बळवंत दाभणे, शकील चव्हाण पोका दिनेश कनोजीया, पोकॉ पंकज फाटे, नापोका, नितेश तेलगोटे व सायबर सेल नापोका सागर धापड, पो.कॉ. रितेश वानखडे, शिवा सिरसाट, सरीता चौधरी यांनी केली आहे.

बातमी शेर करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

स्वराज्य वार्ता मध्ये आपले स्वागत,आजच आमच्या यु ट्यूब चॅनलला सबक्राईब करा, व फेसबुक पेजला लाईक करा. स्वराज्य वार्ता उपलब्ध..डेली हंट,आणि कू,वर सर्व प्रकारच्या जाहिरात आणि बातम्यासाठी संपर्क-8888582858, 9145558551,आमचा अधिकृत व्हाट्सअप्प-9822222707,मेल-swarajyavarta@gmail.com…धन्यवाद.

error: Content is protected !!