उरुळी देवाची हद्दीत अवैध धंदे जोमात

पुणे वार्ता:- पुणे जिल्ह्यातील ,उरुळी देवाची व वाडी-वस्ती परिसरात अवैध दारूविक्री, मटका व जुगार अड्डे, रस्त्या कडेलाच खुलेआम सुरू असलेला वेश्याव्यवसाय पोलिस प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे उदंड झाला आहे. या खुलेआम अवैध धंद्यामुळे येथील रहिवासी त्रस्त आहेत.

उरुळी देवाची, शेवाळवाडी, मंतरवाडी वडकी, होळकरवाडी, हांडेवाडी परिसरात हातभट्टी विक्रीची वीस ते तीस गुत्ते आहेत. अनेक हॉटेल व्यावसायिक विनापरवाना दारु विक्री करत असतात. उरुळी देवाची, हांडेवाडीतील ठराविक ठिकाणी मटका अड्डे, जुगार अड्डे सुरू आहेत. चायनीज गाड्यांवर मद्यपींचा उशीरापर्यंत आरडाओरडा सुरू असतो. गेल्या दोन वर्षांपासून मंतरवाडी मार्गावर हांडेवाडी चौकापर्यंत तसेच हडपसर सासवड मार्गावर उरुळीच्या फरशी ओढ्यापासून वडकीच्या लक्ष्मण वजन काट्यापर्यंतच्या मार्गावर रस्त्याच्या दुतर्फा वेश्याव्यवसाय करणाऱ्या महिला, किन्नर दिवस-रात्र उभ्या असतात.

त्यामुळे या ठिकाणी अवैध वेश्यागमनासाठी येणाऱ्या लोकांचा वावर वाढला आहे. याबाबत कोणी संबंधितांची तक्रार केली तर त्यालाच या व्यावसायिकांकडून दमबाजी केली जाते. अवैध धंद्याचे प्रमाण वाढत चालले असून या धंद्यामुळे या गुन्हेगारीचा आलेखही वाढत आहे. उरुळी देवाची पोलिस चौकी शहर भागात जोडण्यात आल्यामुळे याठिकाणी अवैध धंदे कमी होतील अशी येथील सर्वसामान्यांना आशा होती, मात्र त्या आशेवर पाणी पडलेलं दिसून येत आहे तसेच शहर उरुळी गावामध्ये अनेक हॉटेल्समध्ये विनापरवाना खुलेआम दारु विक्री सुरू आहे, गावातच अनेक ठिकाणी मटका अड्डे बिनदिक्कतपणे सुरू आहे. गुटख्याची सर्रास वाहतूक व विक्री होत आहे.

अवैध धंदे ज्यांच्या हद्दीत आहेत अश्या पोलिस अधिकाऱ्यांवर पोलिस आयुक्तांनी कारवाईचा इशारा दिला असतानाही उरुळी हद्दीत मात्र खुले आम अवैध धंदे कसे सुरू आहेत. व पोलीसांचा वचक व कायद्याचा धाकच राहिला नाही असा सवाल नागरिकांन मधून विचारला जात आहे. ह्या अवैध धंद्यामधून कधी सुटका होईल हेच आता पहावं लागेल.

बातमी शेर करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

स्वराज्य वार्ता मध्ये आपले स्वागत,आजच आमच्या यु ट्यूब चॅनलला सबक्राईब करा, व फेसबुक पेजला लाईक करा. स्वराज्य वार्ता उपलब्ध..डेली हंट,आणि कू,वर सर्व प्रकारच्या जाहिरात आणि बातम्यासाठी संपर्क-8888582858, 9145558551,आमचा अधिकृत व्हाट्सअप्प-9822222707,मेल-swarajyavarta@gmail.com…धन्यवाद.

error: Content is protected !!