मालकास गंडा घालून चौदा लाख लंपास करणा-या कामगाराच्या दत्तवाडी पोलिसांनी आवळल्या मुसक्या

मालकास गंडा घालून चौदा लाख लंपास करणा-या कामगाराच्या दत्तवाडी पोलिसांनी मुसक्या आवळल्या आहेत. याबाबतचा पुढील तपास करत आहेत.

पुणे वार्ता :- दत्तवाडी पो. स्टे. गु.र. नं. ३६/२०२२ भा. द. वि. कलम ३८१, ४०६ प्रमाणे ढमढेरे गॅस एजन्सी, सिंहगड रोड याचे मालक स्वप्नील सुहास ढमढेरे (वय ४३ वर्षे व्यवसाय – गॅस एजन्सी रा- ५०१, सुशील अपार्टमेंट, कृष्णा पथ, लॉ कॉलेज रोड, पुणे ०४) यांनी त्याचा कामगार गजे सिंह उम्मेद सिंह राठोड (वय २६ वर्षे, धंदा गॅस मेकॅनीक, सध्या-रा. के / ऑ राम दामु मोहोळ, बी चाळ, २६/३ अप्पर गल्ली नं ०६ बिबवेवाडी पुणे. कायमचा पत्ता ग्राम- करणीपुरा, ग्रामपंचायत बेठवासिया, ता-औसीया जि-जोधपुर राज्य-राजस्थान) हा दि. २१/०२/२०२२ रोजी सकाळी ११/०० वा. मुख्य ऑफिसमध्ये जमा झालेली दोन ते तीन दिवसांची कॅश रोख १४, १३, १६०/- रुपये ही बँकेत भरणेकामी दिली असता ती बँकेत जमा न करता परस्पर लबाडीचे इराद्याने पैसे घेवून फरार झाला होता. याबाबत वरीलप्रमाणे फिर्याद दिली होती.

सदर फिर्याद दाखल होताच प्रकरणांचे गांभीर्य लक्षात घेवून दत्तवाडी पोलिस ठाणे वरिष्ठ पोलिस निरीक्षक कृष्णा इंदलकर यांनी ताबडतोब तपास पथकाचे तीन पथके बनवुनआरोपीचा शोध घेण्याचे आदेश दिले. आरोपी बाबत पोलिसांनी माहिती घेता आरोपी हा गुन्हा करुन राजस्थान येथे पळून गेला होता. परंतु तो आज दि. २६/०२/२०२२ रोजी मित्रांना भेटुन परत राजस्थान ला पळुन जाण्याच्या तयारीत लक्ष्मीनारायण चौक होल्गा हॉटेलच्याजवळ कोणाची तरी वाट बघत थांबला आहे, अशी खात्रीशीर बातमी दत्तवाडी पोलिस ठाणेकडील पोलिस अमंलदार प्रकाश मरगजे व राहुल ओलेकर यांना मिळाली होती. मा. वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली सापळा रचून त्याचेजवळ एकुण १४, १३, १६०/- रुपये सह अटक करण्यात आली आहे. पुढील तपास चंद्रकांत कामठे, पोलिस उपनिरीक्षक, दत्तवाडी पो. स्टे. पुणे शहर हे करीत आहेत.

यातील आरोपी हा ढमढेरे गॅस एजन्सीमध्ये पाच ते सहा वर्षापासून कामास होता सदरची गॅस एजन्सी पुणे शहरातील विविध भागात हिंदुस्तान पेट्रोलियम गॅस विक्रेते असून त्यांचे बँकेत भरणा करतात. त्याला गॅस एजन्सीच्या कामकाजाची तसेच रोख रक्कमेची पुर्ण माहिती होती. सदर रक्कम मालकच त्याला सुमारे पाच ते सहा वर्षांपासून बँकेत भरण्यास पाठवित होते. परंतु, आर्थिक चणचण असल्याने त्याने मालकाचे पैसे घेवून फरार झाल्याचे आतापर्यंत च्या पोलिस तपासात निष्पन्न झाले आहे.

आरोपीने फरार होताना त्यांचेकडील दुचाकी सिंहगड रोडवर लावुन तिची चावी तसेच मोबाईल फेकून देवून पोलिसांची दिशाभुल करण्याचा प्रयत्न केला होता. परंतु, दत्तवाडी पोलिसांनी वरिष्ठांचे मार्गदर्शनाखाली कौशल्याने तपास करुन गुन्हा उघडकीस आणुन आरोपी अटक करुन गुन्ह्यांतील संपुर्ण रोख रक्कम हस्तगत केली आहे.

सदरची कारवाई ही अपर पोलिस आयुक्त, पश्चिम प्रादेशीक विभाग, राजेंद्र डहाळे, पोलिस उप-आयुक्त, परि. ३, मा. पौर्णिमा गायकवाड, सहा. पोलिस आयुक्त, सिंहगड विभाग, सुनिल पवार, वरीष्ठ पोलिस निरीक्षक, कृष्णा इंदलकर व पोलिस निरिक्षक, (गुन्हे), विजय खोमणे यांचे मार्गदर्शनाखाली तपास पथकातील पोलिस उप-निरीक्षक चंद्रकांत कामठे, स्वप्नील लोहार, पोलिस अंमलदार, कुंदन शिंदे, राजु जाधव, प्रकाश मरगजे, राहुल ओलेकर, विष्णु सुतार, अक्षयकुमार वाबळे, प्रमोद भोसले, नवनाथ भोसले, शिवाजी क्षिरसागर, दयानंद तेलंगे पाटील व भारत आस्मर यांनी केली आहे.

बातमी शेर करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

स्वराज्य वार्ता मध्ये आपले स्वागत,आजच आमच्या यु ट्यूब चॅनलला सबक्राईब करा, व फेसबुक पेजला लाईक करा. स्वराज्य वार्ता उपलब्ध..डेली हंट,आणि कू,वर सर्व प्रकारच्या जाहिरात आणि बातम्यासाठी संपर्क-8888582858, 9145558551,आमचा अधिकृत व्हाट्सअप्प-9822222707,मेल-swarajyavarta@gmail.com…धन्यवाद.

error: Content is protected !!