संगमनेर | एक वर्षांपासून फरार असलेला आरोपी गजाआड

अहमदनगर वार्ता :- संगमनेर तालुका पोलीस स्टेशनला गुन्हा रजिनं १५२७ / २०२० भा. द. वि. क. ३०२ प्रमाणे दि. १४/१२/२०२० रोजी खुनाचा गुन्हा दाखल होता, भिमा बाजीराव डोके वय २२ वर्षे, ग. चांदरफळ ता संगमनेर जि. अहमदनगर याचा आरोपी नामे अजय मलखान तामचीकर रा. धांदरफळ ता संगमनेर जि. अहमदनगर याने खुन करून तो सव्वा वर्षा पासुन फरारी होता.

संगमनेर पोलीस त्याचा शोध घेत होते परंतु तो मिळुन येत नव्हता. त्यानंतर उपविभागीय पोलीस अधीकारी संगमनेर यांचे तपास पथकास सदर आरोपी हा वडगाव निंबाळकर पोलीस स्टेशन हददीत राहण्यास आहे अशी माहीती मिळाल्याने सदरचे तपास पथकाने वडगाव निबाळकर •पोलीस स्टेशन येथे येऊन सदर खुनाच्या गुन्हयातील आरोपी पकडणे कामी पोलीस मदत मागितली असता, वडगाव निंबाळकर पोलीस स्टेशनचे प्रभारी अधीकारी सहा पोलीस निरीक्षक श्री सोमनाथ लांडे सोए, यांनी सदर बाब गांभिर्याने घेऊन पो. स. ई श्री योगेश शेलार सो, तसेच पो. ना. नितीन बोराडे, पो. ना. अमोल भोसले यांना संगमनेर तपास पथकास योग्य ती मदत करण्याच्या सुचना दिल्या, त्यानंतर पो. सई श्री योगेश शेलार सो, तसेच पो. ना. नितीन बोराडे, पो ना अमोल भोसले यांनी गोपनिय बातमीदाराकडून माहीती मिळवून

सदर खुनाच्या गुन्हयातील फरारी आरोपी हा वाघळवाडी ता बारामती जि पुणे येथे राहणेस असले बाबत माहीती मिळवून सदर आरोपी राहत असलेल्या ठिकाणी गेले असता सदर आरोपी अजय मलखान तामचीकर रा. धांदरफळ ता संगमनेर जि. अहमदनगर हा पोलीसांनी पाहुन पळून जाण्याचे तयारीत असताना त्यास पकडुन जेरबंद केले आहे. त्यानंतर सदर आरोपीस उपविभागीय पोलीस अधीकारी संगमनेर यांचे तपास पथकाचे ताब्यात देण्यात आला आहे.

सदरची कामगिरी मा सोमनाथ लांडे सो, सहा पोलीस निरीक्षक वडगाव निबांळकर पोलीस स्टेशन यांचे मार्गदर्शनाखाली पो. स. ई श्री योगेश शेलार सो. तसेच पो. ना. नितीन बोराडे, पो. ना. अमोल भोसले तसेच उपविभागीय पोलीस अधीकारी संगमनेर यांचे तपास पथकातील पो हवा लांडे पो. ना. दातीर, पो कॉ आढाव, पो. कॉ. बोडके, पो. कॉ गाडेकर, पो. कॉ. शिंदे यांनी केली आहे.

बातमी शेर करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

स्वराज्य वार्ता मध्ये आपले स्वागत,आजच आमच्या यु ट्यूब चॅनलला सबक्राईब करा, व फेसबुक पेजला लाईक करा. स्वराज्य वार्ता उपलब्ध..डेली हंट,आणि कू,वर सर्व प्रकारच्या जाहिरात आणि बातम्यासाठी संपर्क-8888582858, 9145558551,आमचा अधिकृत व्हाट्सअप्प-9822222707,मेल-swarajyavarta@gmail.com…धन्यवाद.

error: Content is protected !!