वैद्यकीय शिक्षणासाठी युक्रेनला गेलेली मोशी येथील साक्षी बोराटे युक्रेनमध्ये सुखरूप

चिंबळी दि २७(वार्ताहर सुनील बटवाल) :- वैद्यकीय शिक्षणासाठी युक्रेनला गेलेली मोशी (ता.हवेली ) येथील साक्षी सतीश बोराटे (वय.१८) युक्रेनमध्ये सुखरूप असून सातत्याने कुटूंबाच्या संपर्कात असल्याची माहिती साक्षीचे वडील सतीश बोराटे यांनी दिली आहे.तिच्यासह अन्य विद्यार्थ्यांना आता मायदेशी परतण्याचे वेद लागले आहेत.याबाबत परराष्ट्र मंत्रालयाशी संपर्क झाला असून लवकरच सर्व विद्यार्थ्यांना भारतात आणू असे आश्वासन त्यांनी दिले आहे.परराष्ट्र मंत्रालयाचे त्यासाठी युद्ध पातळीवर त्यासाठी प्रयत्न सुरू आहेत असे  कुटूंबियांनी सांगितले.

साक्षी बोराटे


  साक्षी ही एमबीबीएसच्या प्रथम वर्षाला असून ती युक्रेनमध्ये झाप्रोझिया स्टेट मेडिकल युनिव्हर्सिटीत शिक्षण घेत आहे.तीन महिन्यांपूर्वी आंतरराष्ट्रीय विमान प्रवास सुरु झाल्यानंतर ती भारतातून युक्रेनला गेली होती.आतापर्यंत कधीच युनिव्हर्सिटी असलेल्या राज्यात बंबबारी झाली नव्हती.मात्र काल पासून युद्धामुळे राज्यात बंबबारी सुरू झाल्यानंतर विद्यार्थी काहीसे घाबरलेले आहेत.युनिव्हर्सिटी भागात तशी काही घटना घडली नसली तरी सुरक्षित बंकरमध्ये सगळ्या थांबल्या असल्याचे त्यांनी सांगितले. मात्र संपर्क होत असल्याने चिंतेचे कारण नसल्याचे कुटुंबियांनी सांगितले.साक्षीच्या घरी आई,वडील आणि भाऊ असे कुटूंबीय आहेत.सर्वांना ती आता सुखरूप घरी पोहचावी अशी आतुरता लागली आहे.

बातमी शेर करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

स्वराज्य वार्ता मध्ये आपले स्वागत,आजच आमच्या यु ट्यूब चॅनलला सबक्राईब करा, व फेसबुक पेजला लाईक करा. स्वराज्य वार्ता उपलब्ध..डेली हंट,आणि कू,वर सर्व प्रकारच्या जाहिरात आणि बातम्यासाठी संपर्क-8888582858, 9145558551,आमचा अधिकृत व्हाट्सअप्प-9822222707,मेल-swarajyavarta@gmail.com…धन्यवाद.

error: Content is protected !!