प्रतिनिधी सुनील बटवाल
चिंबळी दि२७( वार्ताहर) पुणे जिल्हा परिषद व पंचायत समिती आरोग्य विभागाच्या वतीने करंजविहीरे प्राथमिक आरोग्य केंद्र अंतर्गत उपकेंद्र चिंबळी येथे आयोजित करण्यात आलेल्या पल्स पोलिओ लसीकरण मोहीमेचा शुभारंभ करजविहीरे प्राथमिक आरोग्य केंद्रांच्या आरोग्य अधिकारी जयश्री महाजन यांच्या हस्ते करण्यात आला.

यावेळी सी एच ओं प्रज्ञा खताळ सिस्टर टि के वाळकोटी व सर्व आरोग्य सेविका कर्मचारी वर्ग उपस्थित होते या चिंबळी उपकेंद्राच्या वतिने गावठाण हद्दीत व बर्गे वस्ती पद्मावती नगर या परिसरातील सुमारे १०४२ बालकांना व मोई येथे ५७५ बालकांना मोफत पोलिओचे डोस देण्यात आले तर शेलपिंपळगाव प्राथमिक आरोग्य केंद्राच्या वतीने केळगाव व चल्होरी मरकळ सोळू धानोरे गोलेगाव पिंपळगाव परिसरात ३०३० बालकांना मोफत पोलिओचे डोस देण्यात आले .
