दर्यापूर – महेश बुंदे
आज दि. २७ फेब्रुवारी २०२२ रविवार रोजी संपूर्ण देशात पल्स पोलीओ अभियान रबविण्यात येत आहे. प्राथमिक आरोग्य केंद्र कोकर्डा कार्यक्षेत्रात २४ बुथ व १ मोबाईल टीम, ३ ट्रान्झिट टीम च्या ० ते ५ वर्ष वयोगटातील बालकाना पोलीओ डोस पाजन्यात येणार आहे. कोकर्डा येथील प्राथमिक आरोग्य केंद्र येथे जिल्हा परिषद उपाध्यक्ष विठ्ठलराव चव्हाण यांचे हस्ते मोहिमेचा शुभारंभ करण्यात आला. या प्रसंगी पंचायत समिती सदस्य मनोहर माहोरे उपस्थित होते. एकही बालक पोलीओ डोस पासुन वंचित राहणार नाही यासाठी प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. रोशन खोरगडे, डॉ. किरन जवादवाड यांच्या तर्फे नागरिकांना आवाहन करण्यात आले आहे.

मोहिमेच्या यशस्वीतेसाठी श्री. चौधरी, श्री. गनोरकर, श्री. थोरात, श्री. खेडकर, सौ. मेश्राम, सौ. काळे, सौ. उके, सौ. कलेताई, श्री. निलेश गायगोले, श्री. मधुकर भुयार यांच्यासह प्राथमिक आरोग्य केंद्राचे सर्व वैद्यकीय अधिकारी, सामुदाय आरोग्य अधिकारी, आरोग्य सहाय्यक, आरोग्य साह्ययिक, आरोग्य कर्मचारी, आशा सेविका, अंगणवाडी सेविका प्रयत्नशील आहेत.
