अमरावती | नागरिकांच्या लेआऊटवर पनपालिया व खानजोडे बिल्डरचा अनधिकृत कब्जा ; महसुल आणि पोलिस प्रशासनातील अधिकाऱ्यांची चुप्पी

• खरेदीधारकांनाच केली जातेय दमदाटी

• प्लॉट खरेदीधारकांची पत्रकार परिषदेत माहिती

प्रतिनिधी जयकुमार बुटे

अमरावती वार्ता :- स्कूल ऑफ स्कॉलर्स जवळच्या निंभोरा (खुर्द) येथील शेत सर्व्हे क्रमांक ४/१ मधील ४ हेक्टर ९९ आर एवढी सन १९८० साली अकृषक करून प्लॉट विक्री करण्यात आलेल्या जमिनीवर आता २०२२ साली कृषक जमिनीची खरेदी दाखवून पनपालिया व खानजोडे नावाच्या बिल्डर्सकडून अनधिकृत कब्जा करण्यात आला आहे.

पहा व्हिडिओ

सदर जमिनीवरील एकूण १९४ प्लॉट्सपैकी १०० प्लॉट्स बांधकाम करण्यात आलेले असून उर्वरीत १०० प्लॉटवर आता नागरिकांना त्यांची घरे बांधण्यापासून निर्बंध घालण्यात येत आहे. या सर्व नागरिकांकडून जुनी खरेदीची कागदपत्रे, अकृषक जमिनीचा पुरावा तसेच अकृषक कर भरल्याची पावती तसेच नमुना ६/२ तसेच फेरफाराची कॉपी असून मुळ प्लॉटधारकांना त्यांच्या प्लॉटवर जाण्यापासून अडविण्याचा तसेच धमकावण्याचा प्रकार संबंधित बिल्डर्स करत असल्याचा आरोप विद्या संदीप ठिपसे यांनी पत्रकार परिषदेत बोलताना केला आहे.

विशेष म्हणजे मुळ प्लॉटधारकांना संरक्षण देण्याऐवजी महसुली अधिकारी आणि पोलिस अधिकारी संबंधित बिल्डरची वर खाल करित असल्याचा घणाघाती आरोप प्लॉटधारकांनी पत्रकार परिषदेतून केला आहे.

१९८० साली जमिनीचे मुळ मालक दत्तात्रय आंबेकर यांच्याकडून त्यांच्या निंभोरा येथील शेतजमिनीला अकृषक करून त्यावरील प्लॉट्सची खरेदी नागरिकांनी केली होती. विशेष म्हणजे ही जमिन त्याच वेळी अकृषक करण्यात आली असून तेव्हापासून नागरिकांनी सदर जमिनीचा अकृषक कर देखील भरला आहे.

याच शेतजमिनीवरील १०० प्लॉट्सवर अनेक नागरिकांनी घरे देखील बांधली असून उर्वरीत प्लॉट्सवर अद्याप संबंधित खरेदीधारकांनी घरे बांधलेली नाहीत. मात्र सदर जमिन ही अकृषक दाखवून ती जमिन खरेदी करण्याचा तसेच त्यावर कब्जा करण्याचा प्रकार पनपालिया नावाच्या बिल्डरने सुरु केला आहे.

पनपालिया यांनी सदर •प्लॉटसवर आपला ताबा करून त्यावर कुंपण घातले असून मुळ खरेदीधारकांना प्लॉटसवर जाण्यास मज्जाव घातला जात आहे. विशेष म्हणजे प्लॉटधारक जबरदस्ती जमिनीवर घुसतात अशी शिरजोरी करत महसुल विभागाकडे आमचीच तक्रार दाखल केल्याची माहिती देखील प्लॉटधारकांनी पत्रकार परिषदेत बोलताना दिली आहे. बिल्डरकडून महसुल तसेच पोलिस यंत्रणेतील अधिकाऱ्यांना चिरीमिरी देऊन त्यांना हाताशी धरले जात असून त्यामुळे प्लॉटधारकांचाच कोणीही वाली उरला नसल्याचे त्यांनी पत्रकार परिषदेतून सांगितले.

सदर प्रकरण हे भूखंडाचे मोठे प्रकरण असून सदर प्रकरणात अनेक अधिकाऱ्यांचे हात ओले झाल्याचा आरोप देखील प्लॉटधारकांनी केला आहे.

आम्हीच सदर प्लॉटसचे मुळ मालक असून आम्हाला आमचा हक्क मिळाला पाहिजे त्यासाठी जिल्हा प्रशासनाने संबंधित पनपालिया व खानजोडे बिल्डर यांच्याकडे असणाऱ्या जमिनीच्या कागदपत्रांची छाननी करावी. आमच्याकडे माहितीच्या अधिकारात संबंधित जमिनीच्या संपूर्ण कागदपत्रांची माहिती असून त्यांच्याकडे सर्व पुरावे हे डुप्लिकेट तसेच हेराफेरी करून जमविले असल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे.

मतदारसंघातील राजकारण्यांच्या जोरावर तसेच तहसीलदार आणि एसडीओ यांच्या सहकार्याने संबंधित बिल्डरची मक्तेट” जमिनीवर सुरू असून त्यामुळे आम्ही मुळ प्लॉटधारक आमच्या हक्कांपासून वंचित असून आम्हाला मिळावा अशी माहिती पत्रकार परिषदेत दिली.

अकृषक जमिन कृषक कशी काय झाली ?

एकदा एखादी जमिन अकृषक झाल्यानंतर ती पुन्हा कृषक जमिन होऊ शकत नाही. सदर जमीन ही १९८० पासून अकृषक असून त्याची खरेदी विविध प्लॉटधारकांनी आधीच खरेदी करून त्याचे वेगवेगळे व्यवहार देखील झालेले आहेत. म्हणजे त्याचा तसा कर देखील खरेदीधारकांनी वेळोवेळी भरला आहे. सदर अकृषक जमिन कृषक कशी काय झाली ? हाच खरा चिंतनाचा आणि संशोधनाचा विषय असून जिल्हाधिकाऱ्यांनी या प्रकरणाची सखोल चौकशी करून संबंधित महसुली अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी प्लॉट खरेदीधारकांनी केली आहे.

बातमी शेर करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

स्वराज्य वार्ता मध्ये आपले स्वागत,आजच आमच्या यु ट्यूब चॅनलला सबक्राईब करा, व फेसबुक पेजला लाईक करा. स्वराज्य वार्ता उपलब्ध..डेली हंट,आणि कू,वर सर्व प्रकारच्या जाहिरात आणि बातम्यासाठी संपर्क-8888582858, 9145558551,आमचा अधिकृत व्हाट्सअप्प-9822222707,मेल-swarajyavarta@gmail.com…धन्यवाद.

error: Content is protected !!