महाळुंगे | अवैधरित्या देशी-विदेशी दारुच्या तसेच बिअरच्या बाटल्या विक्री करणाऱ्यांवर सामाजिक सुरक्षा पथकाची कारवाई

पिंपरी चिंचवड वार्ता :- मा. पोलीस आयुक्त श्री कृष्ण प्रकाश, पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालय यांनी पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीमध्ये अवैध धंद्यावर प्रतिबंध करण्याच्या अनुषंगाने माहिती काढून कारवाई करणेबाबत आदेश दिल्याने सामाजिक सुरक्षा पथक हे पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीमध्ये अवैध धंद्यावर कारवाई करण्याच्या अनुषंगाने गोपनिय माहिती काढत असताना दिनांक २६/०२/२०२२ रोजी महाळुंगे (ई) पोलीस चौकीच्या हद्दीत विनापरवाना अवैधरित्या देशी-विदेशी दारुच्या बाटल्या ताब्यात बाळगुन वाहतूक करणाऱ्या इसमांविरुध्द कारवाई करण्यात आली आहे.

पहा कारवाईचा व्हिडिओ

दिनांक २६/०२/२०२२ रोजी सामाजिक सुरक्षा विभागाचे पथकातील पोलीस अधिकारी व पोलीस अंमलदार यांनी महाळुंगे (ई) पोलीस चौकीच्या हद्दीत Spica Assemblies LLP गेट नं ३५७/१०५ शेड नं १, वाघजाई नगर रोड, खराबवाडी, राजकुमार फोरजिंग जवळ, चाकण ता. खेड जि. पुणे येथील सार्वजनिक रोडवर, चारचाकी कार क्रमांक एमएच १४ एफ एक्स ७७७६ व चारचाकी टेम्पो क्रमांक नं एमएच १४ एच यु १८३२ या वाहनामधुन काही इसम हे कोणताही दारू वाहतुकीचा परवाना नसताना स्वतःचे आर्थिक फायद्यासाठी सदर वाहनांमधुन देशी-विदेशी दारुची साठवणुक करुन विक्री करण्याच्या उद्देशाने वाहतूक करीत आहेत.

अशी गुप्त बातमीदाराकडून मिळालेल्या गोपनिय माहितीवरुन सामाजिक सुरक्षा विभागाचे पथकातील पोलीस अधिकारी व पोलीस अंमलदार यांनी महाळूंगे (ई) पोलीस चौकीच्या स्टेशन हद्दीत १२:१२ वाजता सापळा रचुन छापा टाकला असता खालील मुद्देमाल मिळुन आला व तो जप्त केला असुन त्याचे वर्णन खालील प्रमाणे आहे.

१) ९०,५९१/- रु.किं च्या देशी-विदेशी दारुच्या व बियरच्या बाटल्या. २) ७,५०,०००/- रु कि चे दोन चारचाकी वाहने, असा एकुण ८, ४०,५९१/- रु.किचा मुद्देमाल मिळून आला.

यात आरोपी १) ऋषिकांत पंडित येळवंडे वय ३३ ॐ वर्षे रा. मु.पो. निघोजे ता. खेड जि. पुणे (गाडी नंबर एमएच १४ एफ एक्स ७७७६ चालक) २) रामधार आयोध्या गुप्ता वय ३० वर्षे रा. सध्या सी/१२, द्वारका सिटी, महाळुंगे (ई) ता. खेड जि. पुणे मुळपत्ता मु.पो बानी चंम्का ता. हरदोई राज्य उत्तरप्रदेश २४१२०२ (एमएच १४ एचयु १८३२ चालक) तसेच पाहिजे आरोपी नामे ३) पुना बाईन्स शॉपी मु.पो. वाघजाईनगर, चाकण . खेड जि. पुणे (चालक-मालक) यांनी त्यांच्या वाईनशॉपमधुन अनुज्ञप्तीच्या अटी शर्तीचे उल्लंघन करुन मोठ्या प्रमाणात नियमापेक्षा अधिक दारु विक्री केली म्हणुन त्यांचेविरुध्द महाळुंगे (ई) • पोलीस चौकी चाकण पोलीस स्टेशन येथे गुरनं २९२/२०२२ महाराष्ट्र दारुबंदी अधिनियम १९४९ चे कलम ६५ (अ) (ई).८२,८३ प्रमाणे गुन्हा नोंद करण्यात आला असून पुढील तपास चाकण पोलीस स्टेशन अंतर्गत महाळुंगे (ई) पोलीस चौकी करीत आहे.

सदरची कामगिरी गा. पोलीस आयुक्त श्री कृष्ण प्रकाश, मा. अप्पर पोलीस आयुक्त श्री. डॉ. संजय शिंदे, मा. पोलीस उप-आयुक्त (गुन्हे) श्री. काकासाहेब डोळे मा. सहा. पोलीस आयुक्त डॉ. श्री. प्रशांत अमृतकर, पोलीस निरीक्षक श्री देवेंद्र चव्हाण यांचे मार्गदर्शनाखाली सपोनि श्री. डॉ. अशोक डोंगरे, पोउपनि प्रदिपसिंग सिसोदे, पोउपनि वैयशिल सोळंके, पोलीस अंमलदार विजय कावळे, किशोर पढेर, संतोष बर्गे, नितीन लोंढे, अमोल साडेकर, भगवंता मुठे, वैष्णवी गावडे, सचिन गोनटे, अतुल लोखंडे, सोनाली माने, गणेश कारोट यांनी केली आहे.

बातमी शेर करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

स्वराज्य वार्ता मध्ये आपले स्वागत,आजच आमच्या यु ट्यूब चॅनलला सबक्राईब करा, व फेसबुक पेजला लाईक करा. स्वराज्य वार्ता उपलब्ध..डेली हंट,आणि कू,वर सर्व प्रकारच्या जाहिरात आणि बातम्यासाठी संपर्क-8888582858, 9145558551,आमचा अधिकृत व्हाट्सअप्प-9822222707,मेल-swarajyavarta@gmail.com…धन्यवाद.

error: Content is protected !!