प्रतिनिधी लहू लांडे
चाकण वार्ता :- चाकण मधील श्री शिवाजी विद्यामंदिर चाकण प्रशालेचा इयत्ता 10 वी चा सदिच्छा समारंभ दि. 25 फेब्रुवारी 2022 रोजी उत्साहात संपन्न झाला. यावेळी प्रशालेचे प्राचार्य तथा जनता शिक्षण संस्थेचे सचिव गारगोटे यांच्यासह सर्व शिक्षक व शिक्षिका, कर्मचारी वर्ग उपस्थित होते.

श्री शिवाजी विद्यामंदिर चाकण प्रशालेचा इयत्ता 10 वी चा सदिच्छा समारंभ मोठ्या उत्साहात संपन्न झाला. यावेळी प्रशालेचे प्राचार्य तथा जनता शिक्षण संस्थेचे सचिव सुभाष गारगोटे, संस्था प्रतिनिधी व पर्यवेक्षक अनिल ठुबे व संस्था प्रतिनिधी खाटमोडे, उपप्राचार्य खामकर व प्रा. थोरात, पर्यवेक्षक कोडग, प्रमुख पाहुणे म्हणून राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला आघाडीच्या पदाधिकारी संध्याताई जाधव, मंगलताई जाधव, सी डॅक संस्थेचे संस्थापक भरत पोखरकर व युवा नेतृत्व कु विजया तोडकर व कु. आश्लेषा दहिफळे तसेच सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी व इयत्ता 10 वी चे विद्यार्थी उपस्थित होते.

या कार्यक्रमाचे निवेदन श्रीमती गोरे के के यांनी केले. या कार्यक्रमाचे आभार सांस्कृतिक विभाग प्रमुख राजेंद्र खरमाटे सर यांनी मानले..तर शिक्षक मनोगत श्री महाजन शांताराम यांनी केले.यावेळी सुभाष गारगोटे,अनिल ,ठुबे,रामदास खाटमोडे,बाळासाहेब खामकर,अण्णासाहेब कोडग,तुकाराम थोरात,कविता गोरे, तसेच सर्व शिक्षक, शिक्षिका, पदाधिकारी, विविध क्षेत्रातील मान्यवर व विद्यार्थी मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.

















