पिंपरी | गुंगीचे औषध देऊन काढले अश्लील फोटो, धमकी देऊन वारंवार बलात्कार

पिंपरी वार्ता:- एका वकिलाचा अनोखा प्रताप समोर आला आहे. वकिलाने एका महिलेला कामानिमित्त हॉटेलवर भेटायला बोलावले. तिथे महिलेला गुंगीकारक औषध दिले आणि बलात्कार करून महिलेचे विवस्त्र अवस्थेतील फोटो, व्हिडीओ काढले,

फोटो व्हायरल करण्याची धमकी देत वकिलाने वारंवार बलात्कार केला असल्याची फिर्याद संबंधित महिलेने पिंपरी पोलीस ठाण्यात दिली आहे.. हा प्रकार जून, जुलै 2018 ते 3 फेब्रुवारी 2022 या कालावधीत पिंपरी, शिवाजीनगर, वडगावशेरी, खराडी या भागात घडला. अॅड. अजय अप्पाराव साताळकर आणि दोन महिलांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी पीडित महिलेने 26 फेब्रुवारी 2022 रोजी पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी अजय याने फिर्यादी महिलेसोबत ओळख वाढवून, मैत्री करून प्रेमाची मागणी केली. त्यासाठी फिर्यादीने स्पष्ट नकार दिला. तरीही एसआरए (पुनर्वसन प्रकल्पाचे) मोठे काम मिळाले असल्याचे सांगून पक्षकारांसोबत कामाबाबत बोलणी करून काम समजून घेण्यासाठी फिर्यादीला पिंपरी येथील एका हॉटेलमध्ये बोलावले.

हॉटेलवर पाण्यातून गुंगीकारक औषध देऊन जबरदस्तीने शारीरिक संबंध ठेऊन फिर्यादीचे विवस्त्र फोटो, व्हिडीओ काढले. फिर्यादीसोबत लग्न करणार असल्याचे सांगून हा प्रकार कोणास न सांगण्याची आरोपीने धमकी दिली. आरोपीने फिर्यादीला पुन्हा भेटण्यासाठी संपर्क केला असता फिर्यादीने नकार दिला. त्यामुळे फिर्यादीचे फोट व्हायरल करण्याची धमकी देऊन आरोपीने फिर्यादीला विविध ठिकाणी बोलावून जबरदस्तीने शारीरिक संबंध ठेवले.

अन्य दोन महिला आरोपींनी फिर्यादीस मारहाण, शिवीगाळ व धमकी देऊन माफी मागण्यास सांगितले. त्याचा व्हिडीओ बनवून फिर्यादीचे विवस्त्र अवस्थेतील फोटो, व्हिडीओ तिच्या बहिणीच्या मोबाईलवर पाठवले. फिर्यादीच्या पतीला ते फोटो दाखवून फिर्यादीला मानसिक, सामाजिक व शारीरिक त्रास दिला असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. पोलीस निरीक्षक (गुन्हे) भोजराज मिसाळ तपास करीत आहेत.

बातमी शेर करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

स्वराज्य वार्ता मध्ये आपले स्वागत,आजच आमच्या यु ट्यूब चॅनलला सबक्राईब करा, व फेसबुक पेजला लाईक करा. स्वराज्य वार्ता उपलब्ध..डेली हंट,आणि कू,वर सर्व प्रकारच्या जाहिरात आणि बातम्यासाठी संपर्क-8888582858, 9145558551,आमचा अधिकृत व्हाट्सअप्प-9822222707,मेल-swarajyavarta@gmail.com…धन्यवाद.

error: Content is protected !!