Post Views: 626
पुणे वार्ता :- सांगवी परिसरातील गणेश मोटे आणि पिंपरी परिसरातील अमित सौदे या दोन गुन्हेगारी टोळ्यांवर पिंपरी चिंचवड पोलिसांनी महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण अधिनियम सन 1999 (मोक्का) अंतर्गत कारवाई केली आहे.
याबाबत पोलीस उपायुक्त (गुन्हे) डॉ. काकासाहेब डोळे यांनी माहिती दिली आहे.
टोळी प्रमुख गणेश हनुमंत मोटे (वय 23, रा. कवडेनगर,सांगवी), अश्विन आनंदराव चव्हाण (वय 21, रा. विनायक नगर, सांगवी), महेश तुकाराम माने (वय 23, रा. कवडेनगर, सांगवी) गणेश बाजीराव ढमाले (वय 34, रा. जुनी सांगवी), अक्षय गणेश केंगले (वय 21, रा. भीमाशंकर कॉलनी, पिंपळे गुरव), प्रथमेश संदीप लोंढे (वय 24, रा. कसबा चौक, बारामती), मुजम्मील इस्माईल अत्तार (वय 19, रा. भारतमाता नगर, दिघी), अभिजित भागुजी वारे (वय 18, रा. पिंपे गुरव), गणेश उर्फ मोनू सुनील संकपाळ (वय 21, रा. ओटास्किम, निगडी), अभिजित बाजीराव ढमाले (रा. ढमाले चाळ, जुनी सांगवी), निखिल उर्फ डोक्या अशोक गाडुते (रा. जुनी सांगवी), राजन उर्फ बबलू रवी नायर (रा. सांगवी), निलेश मुरलीधर इयर (रा. कवडेनगर, सांगवी) आणि एक विधिसंघर्षित बालक अशी मोक्काची कारवाई झालेल्या सांगवी परिसरातील टोळीच्या सदस्यांची नावे आहेत.
आरोपींवर पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत कट रचून खून करणे, खुनाचा प्रयत्न करणे, सरकारी कामात अडथळा निर्माण करून खून करण्याचा प्रयत्न करणे, गंभीर दुखापत करणे, जबरी चोरी (चेन चोरी), घातक शस्त्र जवळ बाळगून दहशत माजवून सार्वजनिक शांतता व सुव्यवस्था भंग करणे असे एकूण 25 गुन्हे दाखल आहेत. आरोपींनी संघटित गुन्हेगारी टोळी बनवून हिंसाचाराचा वापर करून वर्चस्वासाठी व आर्थिक फायद्यासाठी संघटितपणे गुन्हे केले आहेत. त्यामुळे त्यांच्या विरोधात मोक्काची कारवाई करण्यात आली आहे.
टोळी प्रमुख अमित भुरेलाल सौदे (वय 25, रा. आंबेडकर कॉलनी रिव्हर रोड, पिंपरी), विकी भुरेलाल सौदे (वय 30, रा. आंबेडकर कॉलनी, रिव्हर रोड, पिंपरी) गुलशनकुमार उर्फ गुलाबचंद उर्फ बल्ली निधीचरण राऊत (वय 28, रा. पवनानगर, काळेवाडी), अक्षय सुभाष बेनवाल (वय 25, रा. आंबेडकर कॉलनी, रिव्हर रोड, पिंपरी), अक्षय उर्फ सोनू मोहन बीडलान (वय 24, रा. सुभाषनगर, पिंपरी), गोपी सुखपाल घलोत (वय 27, रा. आंबेडकर कॉलनी, रिव्हर रोड, पिंपरी) अशी मोक्काची कारवाई झालेल्या पिंपरी परिसरातील टोळीच्या सदस्यांची नावे आहेत.
आरोपींवर पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत खुनाचा प्रयत्न, दरोडा घालणे, खंडणी मागणे, दंगा करून गंभीर दुखापत करणे, जबरी चोरी व बेकायदेशीररित्या घातक शस्त्रे जवळ बाळगणे असे एकूण 13 गुन्हे दाखल आहेत. आरोपींनी संघटित गुन्हेगारी टोळी बनवून हिंसाचाराचा वापर करून वर्चस्वासाठी व आर्थिक फायद्यासाठी संघटितपणे गुन्हे केले आहेत. त्यानुसार त्यांच्या विरोधात मोक्काची कारवाई करण्यात आली आहे. दोन्ही टोळ्यांवर कारवाई करण्याचे आदेश अपर पोलीस आयुक्त डॉ. संजय शिंदे यांनी दिले आहेत.