पुणे वार्ता :- आज दिनांक 27/02/2022 रोजी पुणे जिल्ह्यातील शिरूर तालुक्यातील गणेगाव खालसा गावच्या हद्दीत एका विहिरीत अनोळखी महिला व तिच्या मुलीचा मृतदेह आढळून आला आहे .

सदर महिलेच्या अंगात हिरव्या रंगाची चमकीची साडी गोल्डन सोनेरी रंगाचा ब्लाऊज व लाल रंगाचा परकर घातलेला आहे. पायात ब्राऊन रंगाची सॅंडल आहे ,गळ्यात मनी मंगळसूत्र व तुळशीची माळ आहे. वय अंदाजे 30 ते 32 वर्ष आहे ,तर मुलीच्या अंगात पांढऱ्या रंगाचा फुल बायाचा टी-शर्ट निळ्या रंगाची जीन्स पॅन्ट व गुलाबी रंगाची सॅंडल घातली आहे , मुलीचे वय अंदाजे आठ वर्षे उजव्या पायात काळा धागा चा गोफ आहे.
