दर्यापूर नगरपरिषदच्या वतीने मराठी भाषा दिनाच्या निमित्ताने पत्रकाराचा सन्मान

स्वच्छ सर्वेक्षण, स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव, माझी वसुंधरा, अभियाना अंतर्गत आयोजन

दर्यापूर – महेश बुंदे

दर्यापूर नगरपरिषद प्रशासनाच्या वतीने स्वच्छ सर्वेक्षण-२०२२ व स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव आणि माझी वसुंधरा अभियाना अंतर्गत दि. २३ फेब्रुवारी पासून ते ८ मार्च पर्यत विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. यांच्या कार्यक्रम अंतर्गत दि. २७ फेब्रुवारी रोजी मराठी राजभाषा दिनाच्या निमित्ताने दर्यापूर तालुक्यातील पत्रकाराचा वृक्ष व पुस्तक देऊन सन्मान दर्यापूर नगरपरिषद प्रशासनाच्या वतीने करण्यात आला.

या कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणून नगरपरिषद मुख्याधिकारी व प्रशासक पराग वानखडे, प्रमुख पाहुणे म्हणून जेष्ठ पत्रकार गजाननराव देशमुख, एस.एस.मोहोड, संजय कदम, शशांक देशपांडे आदी उपस्थित होते. यावेळी दर्यापूर नगरपरिषद प्रशासनाच्या वतीने स्वच्छ सर्वेक्षण-२०२२ व स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव आणि माझी वसुंधरा अभियाना अंतर्गत दि. २३ फेब्रुवारी पासून ते ८ मार्च पर्यत विविध कार्यक्रमाचे आयोजित विविध कार्यक्रम बाबत माहिती दिली व कार्यक्रमाला प्रसिद्धी देऊन पत्रकार बांधव यांनी सहकार्य करण्याची विनंती केली. दर्यापूर तालुक्यातील पत्रकार गजाननराव देशमुख, एम.जी.मोरे,.बबनराव शिरभाते, एस.एस.मोहोड, संजय कदम, शशांक देशपांडे, धनंजय धांडे, अमोल कंटाळे, गौरव टोळे, धनंजय देशमुख, महेश बुंदे यांचा सत्कार करण्यात आला. या प्रसंगी मान्यवर मंडळी यांनी आपले मनोगत व्यक्त केले. अध्यक्षीय भाषणात नगरपरिषद मुख्याधिकारी व प्रशासक पराग वानखडे यांनी नगरपरिषद यांच्या वतीने आयोजित या कार्यक्रमाचे प्रास्ताविक श्री. घोगरे यांनी केले तर संचलन विजय सोमवंशी यांनी केले तर आभार प्रदर्शन नगरपरिषद अधीक्षक राहुल देशमुख यांनी केले.कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी नगरपरिषद अधिकारी व कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.

वसुंधरा अभियान जनतेचा सहभाग मोलाचा….

आजच्या काळात गोबल वार्मिंग ही फ़ार मोठी समस्या आहे, पर्यावरण संवर्धन करणे महत्त्वाचे आहे, तरी वसुंधरा अभियान कागदपत्री न राहता ते जनते पर्यंत पोहचून जनतेचा त्यात मोलाचा सहभाग असला पाहिजे.

  • संजय कदम (पत्रकार)

मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाला…

तेराव्या शतकात मराठी भाषेची ओळख झाली, आज जगाच्या कानाकोपऱ्यात अभिमानाने ही भाषा बोलली जाते, या मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाला यासाठी अनेक वर्षांपासून प्रयत्न सुरू आहे, तरी शासनाने मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा द्यावे, अशी मराठी माणसाची मागणी आहे.

— शशांक देशपांडे (पत्रकार)


नगरपरिषद प्रशासनाने प्रथमच केला पत्रकाराचा सन्मान…

दर्यापूर नगरपरिषद प्रशासनाच्या वतीने आजपर्यंत कधीही पत्रकार बंधू यांना बोलावून सन्मान केला असे नाही, पण आज प्रथमच मुख्याधिकारी पराग वानखडे यांच्या कारकिर्दीत प्रथमच पत्रकाराचा सन्मान करण्यात आला, त्याबद्दल त्याचे आभार

  • गजाननराव देशमुख
    (जेष्ठ पत्रकार)

पंधरा दिवस विविध कार्यक्रमाचे आयोजन….

नगरपरिषद प्रशासनाच्या वतीने स्वच्छ सर्वेक्षण-२०२२ व स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव आणि माझी वसुंधरा अभियाना अंतर्गत दि. २३ फेब्रुवारी पासून ते ८ मार्च पर्यत विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. त्यामध्ये स्वच्छता, वृक्षारोपण, क्रीडा स्पर्धा, मॅरेथॉन, निबंध स्पर्धा, प्रभात फेरी, सांस्कृतिक कार्यक्रम, बचतगट कार्यक्रम असे आयोजन कार्यक्रम संपन्न होणार आहेत.

  • पराग वानखडे
    मुख्याधिकारी व प्रशासक, नगरपरिषद दर्यापूर
बातमी शेर करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

स्वराज्य वार्ता मध्ये आपले स्वागत,आजच आमच्या यु ट्यूब चॅनलला सबक्राईब करा, व फेसबुक पेजला लाईक करा. स्वराज्य वार्ता उपलब्ध..डेली हंट,आणि कू,वर सर्व प्रकारच्या जाहिरात आणि बातम्यासाठी संपर्क-8888582858, 9145558551,आमचा अधिकृत व्हाट्सअप्प-9822222707,मेल-swarajyavarta@gmail.com…धन्यवाद.

error: Content is protected !!