भोसरी ते राजगुरुनगर ते डेहणे, अशी बससेवा सुरू करण्याची मागणी

खेड वार्ता :- पुणे महानगर परिवहन महामंडळाने (पीएमपीएमएल) भोसरी ते राजगुरुनगर ते डेहणे, अशी बससेवा सुरू करण्याची मागणी श्री भिमाशंकर ज्येष्ठ नागरिक संघटनेच्या खेड पश्चिम विभागाच्या वतीने पुणे महानगर प्रादेशिक परिवहनच्या व्यवस्थापकांना केली आहे.

याबाबतचे निवेदन श्री भिमाशंकर ज्येष्ठ नागरिक संघटनेच्या वतीने कविता काठे यांनी दिले. त्यात म्हटले आहे की, खेड तालुक्याच्या पश्चिम पट्यातील राजगुरुनगर ते डेहणे या दरम्यानच्या अनेक गावांमधून रोज व्यवसाय व नोकरीसाठी राजगुरुनगर, चाकण, भोसरी या ठिकाणी जाणाऱ्या नागरिकांसह शिक्षणासाठी राजगुरुनगर, चाकण, पुणे येथे जाणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्याही मोठी आहे. एसटी सेवा सुरू असेपर्यंत जाणाऱ्या व येणाऱ्या नागरिकांची सोय होत असे. मात्र, दीर्घकाळापासून एसटी सेवा ठप्प असल्याने या सर्वांची मोठ्या प्रमाणात गैरसोय होत असून, खासगी वाहन चालकांच्या मनमानी कारभाराबरोबरच एसटी बंद असल्याने वाढवलेल्या दराप्रमाणे पैसे द्यावे लागत असून, मनस्तापही सहन करावा लागतो आहे. त्यामुळे बससेवा सुरू करा.

श्री भिमाशंकर ज्येष्ठ नागरिक संघटनेचे अध्यक्ष भीमाजी लांघी, उपाध्यक्ष सखाराम भोमाळे, देवराम हुरसाळे, धोंडू नांगरे, सहदेव जढर, बुधाजी धराडे, तुकाराम भोईर, महिपती सुपे, बबन वनघरे, सदाशिव सोनावणे यांसह अनेक ज्येष्ठ नागरिकांनी बससेवा सुरू करण्याची मागणी केली आहे.

बातमी शेर करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

स्वराज्य वार्ता मध्ये आपले स्वागत,आजच आमच्या यु ट्यूब चॅनलला सबक्राईब करा, व फेसबुक पेजला लाईक करा. स्वराज्य वार्ता उपलब्ध..डेली हंट,आणि कू,वर सर्व प्रकारच्या जाहिरात आणि बातम्यासाठी संपर्क-8888582858, 9145558551,आमचा अधिकृत व्हाट्सअप्प-9822222707,मेल-swarajyavarta@gmail.com…धन्यवाद.

error: Content is protected !!