खेड वार्ता :- राजगुरुनगर नगरपरिषदेचा सन २०२१-२२ या आर्थिक वर्षासाठीचा नगरपरिषद इतिहासातील सहाव्या अर्थसंकल्पात कोणतीही करवाढ करण्यात आली नाही. असा शिलकीचा अर्थसंकल्प असल्याची माहिती राजगुरुनगर नगर परिषदेचे मुख्य अधिकारी निवेदिता घार्गे, अर्थ विभागाचे प्रमुख विकास वाघमारे यांनी दिली.
राजगुरुनगरला नव्याने नगरपरिषद स्थापन झाल्यानंतरचा हा सहावा अर्थसंकल्प आहे.या अर्थसंकल्पात कोणतीही करवाढ करण्यात आली नाही. महसूल जमा व महसुली खर्च असा राजगुरुनगर परिषदेचा ७ कोटी ६७ लाख ३० हजार ३६१ रुपये शिलकीचा अर्थसंकल्प आहे.
विकासाच्या दृष्टीने व जनतेच्या प्रश्नांकडे दुर्लक्ष न करता मार्गदर्शक तत्वानुसार प्रशासनाने हे अंदाजपत्रक बनविले आहे. नगरपरिषदेचे आर्थिक बाजू सक्षम राहण्यासाठी नवीन आर्थिक वर्षात करवसुलीला प्राधान्य देण्यात आले आहे. पाणी योजना, शहरातील भुयारी गटार योजना व शहरातील अनेक भागामध्ये रस्ते मजबुतीकरणाला प्राधान्य देण्यात आले आहे. शहरातील •नागरिकांना स्वच्छ व मुबलक पाणी देण्यासाठी अर्थसंकल्पात विशेष तरतुदी करण्यात आल्या आहेत.
मागील वर्षी (सन २०२०-२१) मध्ये ९ हजार २१९ रुपये असा शिलकीचा अर्थसंकल्प सादर करण्यात आला होता. यावेळी मात्र मर्यादित उत्पन्न व खर्च साधण्याचा प्रयत्न या अर्थसंकल्पात करण्यात आला आहे. नको असलेल्या खर्चाला काटछाट देण्यात आली आहे. एकूण जमा रक्कम ९६ कोटी ४६ लाख ३६ हजार १६२ रुपये आणि एकूण खर्च ८९ कोटी ०९ लाख ०५ हजार ८०१ रुपये असून ७ कोटी ६७ लाख ३० हजार ३६१ असा शिलकीचा अर्थसंकल्प आहे.
राजगुरुनगर नगर परिषदेच्या यावर्षीचा अर्थसंकल्पातील महत्वाच्या काही तरतुदी पुढील प्रमाणे –
गॅस शव दाहिनी, दफनभूमी सहनरक्षक भिंत बांधणे, डॉ बाबासाहेब आंबेडकर उद्यान सुशोभीकरण, वैशिष्टपूर्ण योजना राबविण्यात येणार आहेत रस्ते, काँक्रीटीकरण, राजगुरुनगर हौद ओढा ते घाणा ओढा जोडरस्ते व पूल, दलितवस्ती सुधार योजना, स्वर्ण जयंती नगरोत्थान अंतर्गत रस्ते शौचालये उद्यान विकास आदी साठी तरतुदी करण्यात आल्या आहेत.
राजगुरूनगर नगरपरिषदेच्या अर्थसंकल्पातील उत्पन्नाच्या प्रमुख बाबी पुढील प्रमाणे –