तीन मोटारसायकल चोरांना दर्यापुर न्यायालयाने सुनावली सहा महीने सक्तमजुरीची शिक्षा

प्रतिनिधी महेश बुंदे

अमरावती वार्ता:- दर्यापूर पोलीस स्टेशन येथे अप के 383/2021, 477/2021, 478/2021 व 483/2021 भादंवि कलम 379, 34 प्रमाणे मोटारसायकल चोरीचे गुन्हे दाखल होते. अमरावती ग्रामिण पोलोसांनी कौशल्याने तपास करून मोटारसायकल चोरी करणारे इसम । आकाश संतोष धारपवार वय 23 वर्ष 2. सिध्दार्थ ऊर्फ सिद्ध देवराव दामोदर वय 25 वर्षे 3. विकी गजानन वानखडे सर्व रा. तेल्हारा ता तेल्हारा जि अकाला यांना अटक करुन त्यांच कडुन चोरलेल्या मोटार सायकल जप्त करून गुन्हे उघडकीस आणले होते.

त्यानंतर दर्यापूर पोलीस स्टेशनचे पोहेका साहेबराव चव्हाण, नापोका मंगेश गेडाम, नापोका मंगेश अघळते व नापोका प्रभाकर डोंगरे यांनी तपास करून दोषारोप पत्र मा प्रथमवर्ग न्यायालय दर्यापुर येथे पाठविले होते. प्रथमश्रेणी न्यायदंडाधिकारी दयपुर श्री एस की थोडगे साहेब यांनी दिनांक 25/02/2022 रोजी सदर गुन्हयामध्ये नमुद तिन्ही आरोपीनां सहा महीने सक्त मजुरीची शिक्षा व 500 रुपये द्रव्यदंडाची शिक्षा सुनावली आहे.

न्यायालयामध्ये सरकार तर्फे सौ. ए व्ही भगत यांनी बाजू मांडली त्यांना कोर्ट पैरवी पोहेका प्रदीप धोंडे यांनी मदत केली आहे. पोलीस अधिक्षक श्री अविनाश बारगळ, अपर पोलीस अधिक्षक श्री शशिकांत सातव, उपविभागीय पोलीस अधिकारी, दर्यापुर श्री. गुरुनाथ नायडु यांचे मार्गदर्शनाखाली दयपुर पोलीस स्टेशनचे ठाणेदार प्रमेश अत्राम व त्यांचे सहकाऱ्यांनी सदर उत्कृष्ट कामगिरी केली आहे.

बातमी शेर करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

स्वराज्य वार्ता मध्ये आपले स्वागत,आजच आमच्या यु ट्यूब चॅनलला सबक्राईब करा, व फेसबुक पेजला लाईक करा. स्वराज्य वार्ता उपलब्ध..डेली हंट,आणि कू,वर सर्व प्रकारच्या जाहिरात आणि बातम्यासाठी संपर्क-8888582858, 9145558551,आमचा अधिकृत व्हाट्सअप्प-9822222707,मेल-swarajyavarta@gmail.com…धन्यवाद.

error: Content is protected !!