दर्यापूर – महेश बुंदे
अमरावती वार्ता :- एकीकडे आजादीच्या अमृतमहोत्सवा निमित्त देशात सर्वत्र स्वच्छ भारत अभियान राबविण्यात येत आहे. नागरिकांना वैयक्तिक स्वच्छतेसह सार्वजनिक स्वच्छतेचे धडे दिले जाते आहेत पण नजीकच्या कोकर्डा येथे गल्लोगल्ली आणि इतर सार्वजनिक ठिकाणी अस्वच्छतेचे साम्राज्य पाहावयास मिळते आहे.

गावात सर्वत्र गटारी तुंबल्याने नाल्यातील उग्र वासाचा त्रास नागरिकांना सहन करावा लागतो आहे. कोकर्डा शेंडगाव रस्त्यालगतही अस्वच्छतेचे पाणी वाहते आहे.

राष्ट्रसंत गाडगेबाबा यांच्या जयंतीनिमित्त त्यांना अभिवादन केले जाते पण त्यांनी दिलेल्या स्वच्छतेची शिकवणीचा ग्रामपंचायतीस विसर का होत आहे असा सूर नागरिकाद्वारे व्यक्त केला जातो आहे. तसेच स्वच्छ भारत अभियान 2022 हा प्रकल्प कोकर्डा गावात फक्त कागदोपत्रीच प्रत्यक्षात मात्र काहीच नाही असे दिसून येत आहे.
