अमरावती वार्ता :- दर्यापुर तालुक्यातील लोतवाडा या गावांमध्ये असणाऱ्या गाव तलावाचे पाणी दरवर्षी पावसाळ्यामध्ये गावातील नागरिकांच्या घरात शिरते यामुळे अतोनात नुकसान होत असून भविष्यात जीवित हानी टाळता येणार नाही अशी स्थिती आहे, या गावा तलावाला हटवून इतरत्र गाव तलाव निर्माण करावा किंवा या गाव तलावाच्या आउटलेटची दिशा बदलावी याकरता झालेल्या आंदोलनात आज एकूण सहा जणांनी भाग घेतला होता, यापैकी महिला सरपंच सह तीन महिलांनी विषारी द्रव्य प्राशन करीत आत्मदहनाचा प्रयत्न केला आहे.
तर उर्वरित तिघांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे, सरपंच पंचफुला भीमराव कुराड, कोकिळा राजू रक्षे, सुमित्रा सुभाष रायबोले असे महिलांचे नावे आहेत, या सर्व राहणार लोतवाडा विषारी द्रव्य प्राशन करणाऱ्या महिलांना पोलिसांनी तातडीने दर्यापूर उपजिल्हा रुग्णालयात भरती केले असून त्यांच्यावर प्राथमिक उपचार केल्यानंतर त्यांची प्रकृती अति गंभीर असल्याचे सांगत डॉक्टरांनी तातडीने त्यांना अमरावती येथील जिल्हा रुग्णालयात रवाना केले आहे.
दर्यापुर तालुक्यातील लोतवाडा या गावाकरता पाटबंधारे विभागाच्या माध्यमातून दहा वर्षापूर्वी गाव तलाव तयार करण्यात आला, या गाव तलावाच्या आउटलेटचे पाणी दरवर्षी लोतवाडा या गावांमध्ये शिरत असल्याने अनेक नागरिकांच्या मालमत्तेचे नुकसान होत आहे, यासह जीविताची हानी नाकारता येत नाही, या करता गेल्या दोन वर्षापासून सामाजिक कार्यकर्ते भीमराव कुराडे यांच्या नेतृत्वात या गावात तलावाच्या आउटलेटची दिशा बदलावे किंवा हा गाव तलाव हटवावा याकरता संबंधित प्रशासनाला अनेकवेळा निवेदने पत्र विनंत्या केले आहेत, येथील सरपंच पंचफुला कुराडे यांनी सुद्धा ग्रामपंचायतीच्या माध्यमातून पाटबंधारे विभागाला संभाव्य संकटाच्या पासून अवगत केले आहे मात्र प्रशासन ढिम्म पणे काम करत असून नागरिकांच्या मागणीसाठी कोणताही प्रस्ताव तयार केलेला नाही.
मागील वर्षी याच ठिकाणी जलसमाधी आंदोलन सुद्धा भीमराव कुऱ्हाडे यांच्या नेतृत्वात करण्यात आले होते, त्यावेळी पाटबंधारे विभागाने लेखी आश्वासन देत हा गाव तुला हटवणे या संबंधात पत्र दिले होते मात्र त्यावर सुद्धा एक वर्ष झाल्यानंतर ही कोणतीही कारवाई न झाल्याने भिमराव कुराडे यांच्या नेतृत्वात सरपंच पंचफुला भीमराव कुराडे, कोकीळाबाई राजू रक्षे, सुमित्रा सुभाष रायबोले, राजू तुळशीराम रक्षे सुभाष रायबोले यांनी पाटबंधारे विभागाला २४ फेब्रुवारी पर्यंतचा अल्टिमेटम दिला होता मात्र पाटबंधारे विभागाने या संबंधात कोणतीही कारवाई न केल्याने आज गाव तलावाच्या जवळ आंदोलन करण्यात आले.
यासह पाटबंधारे विभागाच्या कार्यालयावर सुद्धा दर्यापूर मध्ये आंदोलन करण्यात आले दर्यापूर आतील आंदोलनकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले असून गाव तलावाजवळ आंदोलनकर्त्या महिलांना ताब्यात घेण्यास पोलिस पोचले असता त्यांनी त्यांच्या जवळचे विषारी द्रव्य पोलिसांसमोर प्राशन केल्याने खळबळ उडाली आहे पोलिसांनी तातडीने त्यांना उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले असून त्यांची प्रकृती गंभीर असल्याचे डॉक्टरांनी सांगितले आहे गाव तलावाजवळ आंदोलन करत या महिलांना ताब्यात घेण्यास पोलिस पोहोचले असता त्यांनी त्यांच्या जवळचे विषारी द्रव्य पोलिसांसमोर प्राशन केल्याने खळबळ उडाली आहे पोलिसांनी तातडीने त्यांना उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले असून त्यांची प्रकृती गंभीर असल्याचे डॉक्टरांनी सांगितले आहे