पुणे वार्ता :- सुप्रिम फॅसिलिटीजचे माध्यमातुन रिलायन्स वेअर हाऊस भांबोली ता. खेड जि. पुणे हया ग्रॉसरी वेअर हाऊसचे कामकाज पाहणारे उदय धर्मराज पिसाळ, वय ४६ वर्षे, धंदा नोकरी, रा. गणलक्ष्मी कॉलनी लोटस अपार्टमेन्ट फ्लॅट नं.२०२, नेवाळे वस्ती, चिखली, पुणे हे दिनांक २८/०१/२०२२ रोजी रिलायन्स वेअर हाऊस भांबोली येथुन घरी जात असतांना सायंकाळी ०७/०० वाजाताचे सुमारास फिलीप्स कंपनी सावरदरी जवळ आले असता त्यांच्या कारचे उजव्या बाजुने एक बुलेट मोटार सायकल व डाव्या बाजुने दुसरी मोटार सायकल वरुन प्रत्येकी तीन इसम यांनी कारला ओव्हर टेक करून कारचे पुढे मागे येवुन मोटार सायकली चालवत जोरजोरात हॉर्न वाजवीत होते.
कारचे पाठीमागे गाडी थांबव असे मोठ्याने ओरडत होते. त्यावेळी उदय पिसाळ हे सायंकाळी ०७/१५ वाजणेचे सुमारास के एस एच सर्कल खालुंबे ता. खेड जि. पुणे चे पुढे पानसे कंपनीचे जवळील नाल्यावरील पुलाचे पाठीमागे आल्यानंतर तेथे दोन ते तीन गतीरोधक असल्याने कारचा वेग कमी झाला.
त्यावेळी मोटारसायकलवरील अनोळखी इसमाने उदय पिसाळ यांच्या गाडीवर पाठीमागील बाजुने काचेवर दगड फेकून मारला बाबत उदय धर्मराज पिसाळ, वय ४६ वर्षे, धंदा नोकरी, रा. गणलक्ष्मी कॉलनी लोटस अपार्टमेन्ट फ्लॅट नं. २०२, नेवाळे वस्ती, चिखली, पुणे यांनी फिर्याद दिल्याने चाकण पोलीस स्टेशन अंकित महाळुंगे पोलीस चौकी येथे दि. ३०/०१/२०२२ रोजी गुन्हा रजि. नंबर १३३/२०२२ भा.द.वि.कलम ३३६, १४३, १४९ प्रमाणे अनोळखी आरोपीतांविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सदर गुन्हा उघडकीस आणने क्लिष्ट असल्याने सदर गुन्हयाचे तपासात महाळुंगे पोलीस चौकीचे वरीष्ट पोलीस निरीक्षक अरविंद पवार यांनी गुन्हे प्रकटीकरण पथकाचे स.पोनि गुळीग, पो.उनि शिंदे यांना सदरचा गुन्हा उघडकीस आणनेबाबत सुचना दिल्या त्याप्रमाणे सदर गुन्हयाचा सखोल तपास करुन सदर परीसरातील सीसीटीव्ही फुटेजची तपासणी करुन मोटार सायकलींबाबत माहीती प्राप्त करुन, सदर कंपनीमध्ये काम करणा-या कामगारांकडे चौकशी करुन प्राप्त माहितीचे तांत्रिक विष्लेषन करुन स.पोनि गुळीग व पो.उनि किरण शिंदे यांचे पथकाला माहिती प्राप्त झाली की कंपनीमध्ये काम करणारा समिर कारले याचे व फिर्यादी यांचे कामावरुन बिनसले आहे. यावरुन सखोल तपास करुन मुख्य संशयित समिर कारले यास ताब्यात घेऊन विश्वासात घेऊन विचारपुस केली असता सदरचा गुन्हा त्याने व त्याचे इतर ५ साथिदारांनी केला असल्याचे कबुल केले त्याप्रमाणे सदर गुन्हयाचे तपासात खालील आरोपीतांना ताब्यात घेण्यात आले आहे.
गुन्हा दाखल झालेले आरोपींची नावे :
१) प्रल्हाद शांताराम बच्चे, वय २८ वर्षे, रा. मु. हेद्रुज पो. पाईट ता. खेड जि. पुणे
२) समीर माणिक कारले, वय २१ वर्षे, रा. मु.पो. चांदुस ता. खेड जि. पुणे
३) अक्षय शिवाजी घाडगे, वय २४ वर्षे, रा. मु. हेद्रुज पो. पाईट ता. खेड जि. पुणे
४) अक्षय ऊर्फ सुधीर विलास सोनवणे, वय २६ वर्षे, धंदा ट्रान्सपोर्ट, रा. निघोजे ता. खेड जि. पुणे
५) रुपेश खंडु वाळके, वय ३० वर्षे, धंदा शेती, रा. मु. रेटवडी पो. घाटवस्ती ता. खेड जि. पुणे
६) सचिन रामदास विरकर, वय ३० वर्षे, रा. मु.रेटवडी, पो. घाटवस्ती, ता. खेड जि. पुणे
यातील आरोपी यास सदर गुन्हयाचे तपासकामी दिनांक २४/०२/२०२२ रोजी रात्री १०/४५ वा अटक करण्यात आलेली आहे. सदर गुन्हयाचे तपासात आर्ग अॅक्ट ४, २५ व महाराष्ट्र पोलीस कायदा कलम ३७,१३ सह १३५ वाढ करण्यात आला आहे.
सदर गुन्हयाच्या तपासात अटक आरोपीतांकडुन खालीलप्रमाणे मुद्देमाल जप्त केला आहे.