प्रतिनिधी संकेत शिंदे
जुन्नर वार्ता :- शिवजयंती निमित्त येणाऱ्या सर्व शिवभक्तांसाठी जाणाऱ्या व येणाऱ्या शिव भक्तांस चहा व नाष्टा पोहे व पाणी व्यवस्था पुणे जिल्ह्यातील जुन्नर तालुक्यातील जगदंबा गणेश मित्र मंडळ, गणेश नगर ,उदापूर, बनकर फाटा या ठिकाणी सुंदर पद्धतीने करतात तसेच सालाबाद प्रमाणे याही वर्षी मंडळाचे चौथ वर्ष संपन्न झाले. तब्बल सात पोती पोहे अन्नदान करण्यात आले व श्री छत्रपती शिवाजी महाराजांच्या यांच्या प्रतिमेचे पुजन करून व दिपप्रज्वलन करुन कार्यक्रमास सुरुवात झाली .
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन निवेदक संकेत शिंदे यांनी केले 18/ 2 /2022 सायंकाळी चार वाजल्यापासून ते 19/ 2 /2020 रात्री आठ वाजेपर्यंत सर्व सभासद आयोजक सुंदर पद्धतीने सर्व शिवभक्तांना नाश्ता व चहा पाणी देत होते कुठल्याही प्रकारचं सौजन्य नसतानाही आचारी नसताना सर्व मित्रमंडळी एकत्र येऊन हा उपक्रम राबवतात त्यांच्या कार्याला शुभेच्छा त्यांच्याकडून अशीच सेवा देण्याचे काम घडो असे शिव भक्त व नागरिकांना मधून भावना व्यक्त होत आहे.
