जिल्हा मध्यवर्ती बँकेचे अध्यक्ष सुधाकर पाटील भारसाकळे यांची उपस्थिती
दर्यापूर – महेश बुंदे
तालुक्यातील तोंगलाबाद येथे दरवर्षी प्रमाणे यावर्षी सुद्धा वैराग्यमूर्ती संत गाडगेबाबा जयंती निमित्त दर्यापूर येथील समाजसेवक रामुशेठ मालपाणी यांच्या वतीने संपूर्ण गावासाठी महाप्रसाद आयोजित करण्यात आला होता. यावेळी प्रथमता संत गाडगेबाबा यांच्या मूर्तीचे पूजन व हारार्पण जिल्हा मध्यवर्ती बँकेचे अध्यक्ष सुधाकर पाटील भारसाकळे यांच्या हस्ते करण्यात आले. या प्रसंगी अन्नदाते समाजसेवक रामुशेठ मालपाणी यांचा गावकऱ्यांच्या वतीने माजी सरपंच रामहरी राऊत यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
यावेळी समाजसेवक रामुशेठ मालपाणी, खरेदी विक्री संघाचे कार्यकारी अध्यक्ष गजाननराव जाधव, जिल्हा कॉग्रेस महासचिव ईश्वर बुंदीले, जिल्हा कॉग्रेस कमिटीचे अमोल जाधव, वाशीम जिल्हा परिषद सदस्य पांढुरंग कोठाळे, मंगरूळपीर येथील रवी पाटील, आतिष पाटील चौधरी, स्पर्धा परीक्षा मार्गदर्शक प्रा.रवींद्र सरकार, सामाजिक कार्यकर्ते महेश बुंदे, नामदेवराव उटाळे, जिल्हा परिषद शाळेचे मुख्याध्यापक नंदकिशोर रायबोले, तोंगलाबाद ग्रामपंचायत माजी सरपंच रामहरी राऊत, गजानराव जऊळकार,सार्वजनिक वाचनालयाचे संचालक डॉ गोपाल जऊळकार, विजय मोरवाल, बाळासाहेब जळमकर,वामनराव जळमकर, शंकरराव काळे, रघुनाथ बायस्कार, किसनराव गणोदे, अरुण मेहरे, विजय जऊळकार आदी उपस्थित होते. या महाप्रसादाचा संपूर्ण गावकरी नागरिकांनी लाभ घेतला. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी समस्त गावकरी पुरुष महिला, युवक मंडळी यांनी परिश्रम घेतले.