दर्यापूर – महेश बुंदे
नजीकच्या कोकर्डा येथील बहुतांश शेतकरी धानपिकासोबतच भाजीपाला पिकाकडे वळले आहे. कोकर्डा अंतर्गत येत असलेल्या रामपुरा येथील रवी उपाध्ये या शेतकऱ्यांने आपल्या दीड एकरच्या शेतात मिरची पिकाची लागवड केली आहे. शेतजमिनीत दरवर्षी नवनवीन प्रयोग आपल्या कल्पनेतून करण्याचे धाडस ते दाखवितात. यावर्षी त्यांनी आपल्या दीड एकरात मिरची पिकाची लागवड केली. यासाठी त्यांना २ लाख ५० हजार रुपयांचा खर्च आला.
