प्रतिनिधी फुलचंद भगत
वाशिम:-मध्यप्रदेशातील बैतुल जिल्यातील जंगल-खोरे परिसर पर्यटकांना विशेषता साहसी पर्यटकांना नेहमीच खुणावत आले आहे.भोंड्याकुंड परिसरातील खोऱ्यांचे संकुल आपल्या वैशिष्टयपूर्ण रचनेने नटलेला असा परिसर.ह्या परिसरातील 200 पेक्षा अधिक फूट खोल आणि तिच्या दोन्ही टोकांमधील सुमारे 400 फुटांचे अंतर दोरावरून पार करणे हा एक थरारक अनुभवच!चारशे फुटांच्या व्हॅली क्रॉससिंग ची चाचणी दिनांक 20 फेब्रुवारी 2022 रोजी अकोला जिल्हा गिर्यारोहण संघटना व अमरावती जिल्हा गिर्यारोहण संघटना यांच्या संयुक्त विद्यमानाने आयोजन करण्यात आले होते.
