प्रतिनिधी फुलचंद भगत
वाशिम – तालुक्यातील ग्राम तोंडगाव येथे संघर्ष व परिश्रमातुन पुढे आलेल्या कर्तृत्ववान ग्रामीण व्यवसायीकांना प्रत्येक दहा हजाराची रोख मदत करुन तसेच गुणवंत विद्यार्थी, अधिकारी, कर्मचार्यांचा सत्कार करुन छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती तथा डॉ. नि.कृ. गोटे यांची पुण्यतिथी १९ फेब्रुवारी रोजी आगळ्यावेगळ्या पध्दतीने साजरी करण्यात आली.

कार्यक्रमाला अध्यक्षस्थानी बालरोगतज्ञ डॉ. विजय कानडे तर प्रमुख पाहुणे म्हणून ह्दयरोगतज्ञ डॉ. सिध्दार्थ देवळे, किडणीतज्ञ डॉ. पंकज गोटे, शिवसेनेचे माजी जिल्हाप्रमुख डॉ. सुधीर कव्हर, जि.प. सदस्य दामुअण्णा गोटे, देखरेख अध्यक्ष चरण गोटे, कृउबास प्रशासक बाळासाहेब गोटे, वामनराव गोटे, त्र्यंबक पाटील, दाजीबा पाटील, उपसरपंच गजानन गोटे, तामसाळा उपसरपंच प्रकाश चवाळे, पांडूरंग मेंबर, डॉ. एकनाथ लोखंडे, विनोद हजबे, गजानन गोटे, विष्णूपंत सुरेकर, सिताराम गोटे, हनुमान गोटे, शंकर तान्हाजी, गणेश सदाशिव, तुळशिराम मल्हारी, तुकाराम मानदार, सुनिल मानदार, विठ्ठल मानदार, अविनाश मानदार, गणेश मानदार, मदन गोटे, डॉ. सुरेश गोटे, जगन्नाथ काळे, उध्दव गोटे, अशोक ढोले, भगवान ढोले, समाधान ढोले, संतोष गोटे, ग्रा.पं. सदस्य लक्ष्मण काटे, गोडघासे, दयाराम ढोले आदींची उपस्थिती होती. प्रारंभी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेला पुष्प अर्पण करुन अभिवादन करण्यात आले. कार्यक्रमाच्या औचित्याने मान्यवरांनी आपल्या मनोगतातून शिवजयंतीचे महत्व व्यक्त केले.

नौकरीच्या मागे न लागता युवकांनी व्यवसायाकडे वळावे असे मत डॉ. विजय कानडे यांनी व्यक्त केले. तर शिवाजी महाराजांचे चरित्र नुसते पठन न करता ते आत्मसात करावे असे मार्गदर्शन डॉ. सुधिर कव्हर यांनी केले. आपण आपल्या जीवनात प्रामाणिकपणे काम केल्यास जीवनात यशस्वी होतो असे प्रतिपादन डॉ. सिध्दार्थ देवळे यांनी केेले तर आजच्या युवकांनी छत्रपती शिवाजी महाराजांनी समजून घेण्याची गरज आहे असे मत डॉ. पंकज गोटे यांनी मांडले.
