प्रतिनिधी फुलचंद भगत
वाशिम – रक्तदान ही काळाची गरज असून या क्षेत्रात मोरया ब्लड डोनर ग्रुपने उल्लेखनिय कार्य करुन समाजापुढे आदर्श ठेवला असल्याचे प्रतिपादन शिक्षक आमदार अॅड. किरणराव सरनाईक यांनी केले. छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त मोरया ब्लड डोनर ग्रुपच्या वतीने १९ फेब्रुवारी रोजी स्थानिक श्री छत्रपती शिवाजी महाराज चौकात आयोजीत रक्तदान शिबीराला शिवप्रेमींचा मोठा प्रतिसाद लाभला. यावेळी तब्बल ५१ जणांनी रक्तदान करुन आपली सामाजीक जबाबदारी पार पाडली.
