पिंपरी चिंचवड वार्ता :- मा. पोलीस आयुक्त श्री कृष्ण प्रकाश पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालय यांनी पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीमध्ये अवैध धंद्यावर प्रतिबंध करण्याच्या अनुषंगाने माहिती काढून कारवाई करणेबाबत आदेश दिल्याने सामाजिक सुरक्षा पथक हे पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीमध्ये अवैध धंद्यावर कारवाई करण्याच्या अनुषंगाने गोपनिय माहिती काढत असताना दिनांक २२/०२/२०२२ रोजी पिंपरी पोलीस स्टेशन हद्दीत अवैधरित्या शासनाने प्रतिबंधीत केलेला तंबाखूजन्य गुटख्याची विक्री करण्याच्या उद्देशाने साठवणूक करणाऱ्या इसमांवर कारवाई करण्यात आली आहे.
दिनांक २२/०२/२०२२ रोजी सामाजिक सुरक्षा विभागाचे पथकातील पोलीस अधिकारी व पोलीस अंगलदार यांनी १७:३० वा चे सुमारास रूम नं १६ दातीर पाटील कॉलनी, मोहननगर, चिंचवड पुणे येथे इसम नाम प्रकाश गमनाराम चौधरी हा त्याचे राहते घरात गुटख्याची साठवणुक करुन गुटख्याची स्वतःची आर्थिक फायदयाकरीता आजुबाजुच्या परिसरात विक्री करीत आहे. अशी गुप्त बातमीदारकडुन मिळालेल्या माहितीवरुन सामाजिक सुरक्षा विभागाचे पथकातील पोलीस अधिकारी व पोलीस अंमलदार यांनी पिंपरी पोलीस ठाणे हद्दीत सापळा रचुन छापा टाकला असता आरोपीच्या ताब्यात मिळुन आलेल्या मुद्देमालाचे खालीलप्रमाणे आहे.
१) ३१००/- रु रोख रक्कम
२) २०२२०/- रु.कि. चा तंबाखुजन्य गुटखा
असा एकूण ९३३२०/- रु.किं.चा मुद्देमाल मिळुन आला म्हणुन इसम नागे १) प्रकाश गमनाराम चौधरी, रा. राम मंदिराजवळ, रामनगर, चिंचवड पुणे हा त्याचे राहते घरामध्ये शासनाने प्रतिबंधक केलेला गुटख्याची विक्रीकरीता साठवुण करताना मिळुन आला. तसेच पाहिजे आरोपी नामे २) काळुराम लाबुराम देवासे वय-३५ वर्षे रा. चाकण पुणे याने शासनाने प्रतिबंधक केलेल्या तंबाखुजन्य गुटखा प्रकाश चौधरी यास विक्रीकरीता पुरविला म्हणुन पिंपरी पोलीस ठाणे येथे गुरनं १००/२०२२ भादंवि कलम ३२८ २७२ २७३ १८८ ३४ प्रमाणे गुन्हा नोंद करण्यात आला असुन पुढील तपास पिंपरी पोलीस ठाणे करीत आहे.
वरील कारवाईमध्ये एकुण ९३३२०/-रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.