दर्यापूर – महेश बुंदे
विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्वाच्या समतोल आणि सर्वांगीण विकासासाठी पुस्तकी ज्ञानाव्यतिरिक्त त्यांच्या सुप्त कलागुणांना वाव देणारे उपक्रम आयोजित करणे गरजेचे आहे. सरकार ॲकडमी तर्फे आयोजित करण्यात आलेल्या स्पर्धा परीक्षांमुळे करिअरचा मार्ग ठरविण्याचे मार्गदर्शन होत आहे. यामुळे ग्रामीण भागातील विद्यार्थी नक्कीच शहरातील विद्यार्थ्यांशी स्पर्धा करण्याची स्वप्न बघू शकतो, असे प्रतिपादन सरकार अकॅडमीचे संचालक प्रा. रवींद्र सरकार यांनी केले. दर्यापूर मधील आयशा टावर येथे आयोजित तालुकास्तरीय सामान्य ज्ञान स्पर्धा तीन दिवस घेण्यात आली. प्रा. संदीप निशांतराव म्हणाले. ‘सामान्य ज्ञान स्पर्धेमुळे स्पर्धा परीक्षांची तयारी व तोंडओळख होत असल्याने विद्यार्थ्यांच्या करिअरसाठी आतापासूनच तयारी केली जात आहे. शिक्षण क्षेत्राला उभारी देणारा हा उपक्रम आहे. ही स्पर्धा विद्यार्थ्यांच्या पंखांना बळ देणार आहे.

तीनशेहून अधिक विद्यार्थी सहभागी